Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड जॅकलिन फर्नांडिस योगा करताना ‘या’ गोंडस पार्टनरने दिली तिला साथ; पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री!

जॅकलिन फर्नांडिस योगा करताना ‘या’ गोंडस पार्टनरने दिली तिला साथ; पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री!

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेसबाबत खूपच गंभीर आहे आणि बर्‍याचदा आपल्याला याची झलक देखील पाहायला मिळते. कोरोनामुळे जिम व योग केंद्रेही बंद आहेत. अशा परिस्थितीत जॅकलिन तिच्या घरीच राहून तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.

अलीकडेच जॅकलिनने इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. यात ती केवळ योगा करताना दिसली आहे, मात्र यातील मजेची गोष्ट आहे तिची मांजर. होय. जॅकलिनने शनिवारी (२२ मार्च) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, ती योगा करत असताना तिची मांजरही तिला साथ देत आहे.

योगाला दिले ‘कॅट योगा’ नाव
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, जॅकलिन फर्नांडिस काळजीपूर्वक योगा करण्याचा प्रयत्न करत आहे. यात तिची मांजर कधी तिच्या आजूबाजूला, तर कधी इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कॅट योगा.”

संस्थेसोबत मिळून करतेय काम
जॅकलिनने अनेकदा प्राण्यांवर असलेले तिचे प्रेम सिद्ध केले आहे. यापूर्वी अभिनेत्री प्राण्यांच्या संदर्भात चर्चेत आली होती. कोरोना काळात भटक्या जनावरांना अन्न मिळत नाहीये, त्यामुळे ती अशा प्राण्यांच्या देखरेखीसाठी एका संस्थेसोबत मिळून काम करत आहेत. जॅकलिनने सोशल मीडियावर याचे बरेच फोटोही शेअर केले होते, ज्यात ती कुत्रे आणि मांजरींवर प्रेम करताना दिसली होती.

या चित्रपटांत दिसणार अभिनेत्री
या दिवसात जॅकलिन फर्नांडिसकडे बरेच चित्रपट आहेत. ती अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याशिवाय ती सलमान खानच्या आगामी ‘किक २’ या चित्रपटमध्येही दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ चित्रपटात आणि सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतमसोबत ‘भूत पोलिस’ मध्येदेखील दिसू शकते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

हे देखील वाचा