Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड दुबईमध्ये स्वीमिंग पूलचा आनंद लुटतेय जॅकलिन, बोल्ड फोटो झाले व्हायरल

दुबईमध्ये स्वीमिंग पूलचा आनंद लुटतेय जॅकलिन, बोल्ड फोटो झाले व्हायरल

बॉलिवूडमधील हॉट आणि नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन ही इंडस्ट्रीमधील एक व्यस्त अभिनेत्री आहे. कधी चित्रपटामुळे तर कधी तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी जॅकलिनचे बादशाहसोबत ‘पानी पानी’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. जॅकलिन ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. शिवाय तिचे अनेक बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा अत्यंत बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जॅकलिनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही मोनोकनीमधील फोटो शेअर केले आहेत. ती सध्या दुबईमध्ये आहे. तिथे ती स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. जॅकलिनने निळ्या रंगाची मोनोकनी घातली आहे. यासोबत तिने डोळ्यांवर चष्मा लावलेला दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये उभी राहिलेली दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे. (Jacqueline Fernandez share her swimming photos on social media)

जॅकलिनचे स्वीमिंग पूलमधील हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केले आहे. जॅकलिनने दिवाळीमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून फोटो शेअर केला होता. तिच्या त्या फोटोला देखील तिच्या चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. यावरून असे लक्षात येते की, चाहत्यांना तिचा मॉर्डन लूक जेवढा आवडतो तेवढाच पारंपारिक लूक देखील आवडतो.

जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘जुडवा २’, ‘किक’, ‘रेस ३’, ‘हाऊसफुल ३’, ‘डिशुम’, ‘अ फ्लाईंग जॅट’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. या सोबत ती लवकरच ‘किक ३’, ‘भूत पोलीस’, ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा