Saturday, July 6, 2024

‘विल-ख्रिसला एकत्र बघायचे आहे..’ जाडा पिंकेट स्मिथने गाजलेल्या वादावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा विल स्मिथच्या (Will Smith) वादामुळे चांगलाच गाजला.  ऑस्कर 2022 ला बराच काळ निघून गेला आहे, पण जेव्हा जेव्हा त्यावर चर्चा होते तेव्हा प्रथम कानाखाली मारलेल्या घटनेची चर्चा सुरू होते. त्यावेळी विल स्मिथने पत्नी जाडा पिंकेटची चेष्टा केल्याबद्दल ख्रिस रॉकला स्टेजवर थप्पड मारली होती. या घटनेमुळे हा पुरस्कार सोहळा प्रचंड गाजला होता. त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया न दिलेल्या जाडा पिंकेटने तिच्या फेसबुक वॉच शो रेड टेबल टॉकमध्ये या प्रकरणावर मौन सोडले आहे. काय म्हणाली याबद्दल जाडा पिंकेट चला जाणून घेऊ.

जाडा टॉक शोचा नवीन भाग तिच्या एलोपेशिया या आजारावर आधारित होता. ऑस्कर सोहळ्यात घडलेल्या घटनेचा संदर्भ देताना ती म्हणाली, “हे अलोपेसियावरील अतिशय महत्त्वाचे रेड टेबल टॉक आहे. माझ्या तब्येतीबद्दल आणि ऑस्कर सोहळ्यात काय घडले याबद्दल शेकडो लोकांनी त्यांच्या कथा माझ्याशी शेअर केल्या. मी या क्षणी त्या कथा एकत्र करत आहे आणि लोकांना एलोपेशिया होता काय आहे हे सांगत आहे. टॉक शो दरम्यान जाडाने विल स्मिथ आणि ख्रिस रॉकबद्दलही मत व्यक्त केले ती म्हणाली की “आता ऑस्करच्या रात्री घडलेल्या घटनेचा संदर्भ घेऊ. मला आशा आहे की हे दोन प्रतिभावान लोक (विल स्मिथ आणि ख्रिस रॉक) एकमेकांना त्यांच्यातील अंतर कमी करण्याची संधी देतील. मला त्या दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा आहे. आजच्या काळात आपल्याला या दोघांची गरज आहे.”

या 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉक स्टेजचे संचालन करत होते. त्यादरम्यान त्याने जाडा पिंकेटच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली, जी विल स्मिथला सहन होत नव्हती. तो रागाने स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिस रॉकला थप्पड मारली. ऑस्कर 2022 मध्ये, विल स्मिथने त्याच्या किंग रिचर्ड्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा खिताब जिंकला होता, परंतु नंतर त्याच्यावर ऑस्कर आणि इतर पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागासाठी 10 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

हे देखील वाचा