Saturday, June 29, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचा ऑस्करकडून विशेष सन्मान, ३९७ मान्यवरांच्या यादीत अभिनेत्रीही काजोलनेही मिळवले स्थान

सुर्या शिवकुमार (Surya Shivkumar) हा दाक्षिणात्य सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि देखण्या लूकमुळे सुर्याने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अलिकडेच सुर्याचा जय भीम चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील सुर्याच्या अभिनयाचे जगभरात कौतुक झाले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. यानंतर आता सुर्याचा खुद्द ऑस्कर पुरस्कार कमिटीमध्ये समावेश करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला आहे. या कमिटीमध्ये स्थान मिळवणारा सुर्या पहिलाच भारतीय अभिनेता ठरला आहे. 

अभिनेता सुर्या हा दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. सुर्याचा फक्त दाक्षिणात्य सिने जगताच नव्हेतर बॉलिवूडमध्येही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. २०२१ मध्ये सुर्याचा जयभीम चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची जगभरात चर्चा झाली होती.या चित्रपटाची ऑस्करसाठीही निवड करण्यात आली होती. परंतु चित्रपटाला हा पुरस्कार मिळू शकला नाही. परंतु आता ऑस्करने अभिनेता सुर्याला अकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एंड साइसेंस तर्फे जाहीर केलेल्या ३९७ मान्यवरांच्या यादीत स्थान दिले आहे. असा सन्मान मिळवणारा तो एकमेव साऊथ अभिनेता आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याच्या व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री काजोललासुद्धा या यादीत स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपट निर्माती रीमा कागतीचे नावही या यादीत समाविष्ठ केले गेले आहे. या मोठ्या पुरस्कारासाठी देशातील तीन कलाकारांची नावे निवडली गेल्याने देशाची मान उंचावली आहे. या कलाकारांचे सध्या सोशल मीडियावरुन जोरदार कौतुक केले जात आहे. या पुरस्कारासाठी बिलिश एलिश, ओल्गा मेरिडिज आणि सियान हेडर सारख्या अनेक दिग्गजांना आमंत्रित केले गेले आहे. दरम्यान अभिनेता सुर्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये सुर्या सिंघम सारख्या धमाकेदार चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –शाहिद कपूर आणि मीरा राजपूतला इटलीत व्हेज फूड न मिळाल्याने हॉटेलवर संताप, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सलमान खाननंतर ह्रतिक रोशनसोबत झळकणार शहनाज गिल, व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

भरतला ‘या’ कारणामुळे ईशा देओलने मारली होती कानशिलात, १० वर्षानंतर झाली प्रेमाची प्रचिती | WEDDING ANNIVERSARY

 

 

 

 

हे देखील वाचा