टीजे ज्ञानवेलचा तामिळ चित्रपट ‘जय भीम’ वाद आणि टीकेच्या भोवऱ्यात अडकूनही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान बनवत आहे. प्रेक्षक ना तो पाहण्यात मागे हटत आहेत, ना त्याची प्रशंसा करण्यात कमी पडत आहेत. साऊथचा सुपरस्टार सूर्याचा हा चित्रपट रिलीझ झाल्यापासून सतत चर्चेत आहे. आता ‘जय भीम’ने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे, ज्यासाठी त्याच्या टीमचे अभिनंदन होत आहे.
या चित्रपटाने आता ‘द शॉशँक रिडेम्प्शन’ला मागे टाकून, सर्वाधिक रेटिंग मिळवणारा आयएमडीबी (IMDb) चित्रपट बनला आहे. ‘जय भीम’ला १० पैकी ९.६ रेटिंग मिळाले आहे. मंगळवारी, २ नोव्हेंबरला ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने, अवघ्या काही दिवसांत आयएमडीबी रेटिंगमध्ये इतकी मोठी कामगिरी केली, हे कौतुकास्पद आहे. सतत विरोध आणि वाद असूनही, आयएमडीबीच्या यादीत प्रथम येणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. (jai bhim breaks record becomes highest rated film on imdb letting the shawshank redemption down)
साऊथचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तेच याचे लेखकही आहेत. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रा यांच्या एका प्रसिद्ध प्रकरणावर आधारित हा चित्रपट तामिळनाडूतील एका जमातीवरील अत्याचार दाखवतो. सुपरस्टार सूर्या व्यतिरिक्त, लिजोमोल जोस, के मणिकंदन, राजिशा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज या कलाकारांनीही चित्रपटात दमदार अभिनय केला आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तामिळनाडूतील वन्नियार समुदायातील लोकांनी त्यातील काही सीन्सवर आक्षेप व्यक्त केला होता. तेव्हापासून मुख्य अभिनेता सूर्याला सातत्याने टार्गेट केले जात होते. दरम्यान, दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांनी तमिळ भाषेत माफीनामा जारी केला असून, चित्रपटाद्वारे कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे जाहीर केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट