ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष‘ या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडला आहे. अशात आता या चित्रपटातील ‘जय श्री राम’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे, जे समोर येताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे .
शनिवारी (दि. 20मे)ला, ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेरीस बहुप्रतिक्षित गाणे ‘जय श्री राम’ रिलीज केले. मनोज मुनताशीर शुक्ला यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल अंगावर काटा आणणारे आहे. या गाण्याचे संगीत अजय-अतुल यांनी दिले असून, हे गाणे रिलीज झाल्यापासून यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
गाण्याचे दृश्य हृदयाला भिडणारे आहे. जिथे प्रभास श्रीरामच्या व्यक्तिरेखेत खूप उत्तम दिसत आहे, तर तिथेच क्रिती सेनॉन जानकीच्या भूमिकेत तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. गाण्याचे बोल ऐकल्यानंतर आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मनोज मुनताशीर सर डिवाइन लिरिक्सला सलाम.’, तर दुसर्याने कमेंट करत लिहिले की, ‘आदिपुरुषचे निर्माते दररोज अंगावर काटा आणत आहेत.’ अशातच एक युजर म्हणाला, ‘हे गाणे पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात रामच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग दिसणार आहेत, तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. कृष्ण कुमार, राजेश नायर, भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि ओम राऊत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणर आहे. (jai shree ram song release from prabhas kriti sanon starrer film adipurush directed by om raut)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबईतील वांद्रे येथे सलमान खान बांधणार 19मजली हॉटेल, ‘या’ सुविधांनी सुसज्ज असेल इमारत
‘द केरला स्टाेरी’वरून पुण्यातील FTIIमध्ये राडा, माेठ्या पाेलीस फौजफाट्यासह चित्रपटाचं स्क्रीनिंग