Tuesday, January 13, 2026
Home साऊथ सिनेमा ‘जना नायकन’पूर्वी थलापती विजयचा सुवर्णकाळ, सलग सात सुपरहिट चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा केला पार

‘जना नायकन’पूर्वी थलापती विजयचा सुवर्णकाळ, सलग सात सुपरहिट चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा केला पार

थलापती विजय यांची मोस्ट अवेटेड आणि शेवटची मानली जाणारी फिल्म ‘जना नायकन’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटामुळे विजय यांच्या कारकिर्दीतील काही सुपरहिट आणि संस्मरणीय चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मास एंटरटेनर असो वा दमदार अ‍ॅक्शन-ड्रामा, विजय यांनी प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. तुम्हीही विजयचे कट्टर चाहते असाल, तर त्यांच्या या गाजलेल्या चित्रपटांची यादी नक्कीच पाहण्यासारखी आहे.
लिओ (2023) – हिमाचल प्रदेशमध्ये कुटुंबासोबत शांत आयुष्य जगणाऱ्या एका कॅफे मालकाची ही कथा आहे. एका हिंसक घटनेनंतर त्याचं आयुष्य उलथापालथ होतं आणि तो धोकादायक ड्रग कार्टेलच्या विरोधात उभा राहतो. ‘लिओ’ ने जागतिक बॉक्स ऑफिसवर सुमारे 605.9 कोटी रुपये कमावले.
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (2024) – या चित्रपटात विजय एका टॉप इंटेलिजन्स एजंटच्या भूमिकेत दिसतात, जो सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपली धोकादायक नोकरी सोडतो. मात्र, जुना मिशन पुन्हा समोर येतो आणि त्याला परत मैदानात उतरावं लागतं. या चित्रपटाने जगभरात 457 कोटी रुपयांची कमाई केली.
बिगिल (2019) -‘बिगिल’मध्ये मायकेलची कथा आहे, जो वडिलांच्या मृत्यूनंतर फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न सोडतो. पुढे तो महिला फुटबॉल टीमचा कोच बनतो आणि आयुष्याला नवा अर्थ मिळवतो. या स्पोर्ट्स अ‍ॅक्शन फिल्मने 295.85 कोटी रुपये कमावले.
मास्टर (2021) – एका कॉलेज प्रोफेसरला सुधारगृहात शिकवण्यासाठी पाठवण्यात येतं. तिथे त्याची भेट एका क्रूर गँगस्टरशी होते, जो मुलांचा गैरवापर गुन्ह्यांसाठी करतो. विजय सेतुपती आणि विजय यांच्या या चित्रपटाने 223 कोटींचा व्यवसाय केला.
बीस्ट (2022) -‘बीस्ट’मध्ये विजय (vijay)रॉ एजंट वीराच्या भूमिकेत दिसतात. चित्रपटाने थिएटरनंतर नेटफ्लिक्सवरही मोठी लोकप्रियता मिळवली आणि बॉक्स ऑफिसवर 240 कोटींहून अधिक कमाई केली.
मर्सल (2017) – एका डॉक्टरवर खुनाचा खोटा आरोप होतो, पण पुढे कळतं की हा गुन्हा त्याच्या हमशक्लाने केला आहे. सामाजिक संदेश असलेल्या या चित्रपटाने 257 कोटी रुपये कमावले.
सरकार (2018) – एका एनआरआय व्यावसायिकाच्या मताचा गैरवापर झाल्यानंतर तो लोकशाहीसाठी लढा देतो. ‘सरकार’ने बॉक्स ऑफिसवर 253 कोटी रुपयांची कमाई केली.

या चित्रपटांमधून थलापती विजय यांची स्टार पॉवर आणि अभिनयाची विविधता स्पष्टपणे दिसून येते, त्यामुळे ‘जना नायकन’साठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

टॉक्सिक टीझरमध्ये यशसोबत झळकलेली मिस्ट्री गर्ल कोण? बीट्रिज टौफेनबैक बद्दल जाणून घ्या सविस्तर

हे देखील वाचा