Monday, February 23, 2026
Home साऊथ सिनेमा सेन्सॉर सर्टिफिकेटच्या वादात अडकलेली थलापती विजयची ‘जना नायकन’ 9 जानेवारीला होणार नाही रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

सेन्सॉर सर्टिफिकेटच्या वादात अडकलेली थलापती विजयची ‘जना नायकन’ 9 जानेवारीला होणार नाही रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

थलापती विजयच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या आगामी चित्रपट ‘जना नायकन’ बाबत प्रचंड उत्सुकता होती. सुपरस्टारचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी, पोंगलपूर्वी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. मात्र, रिलीजच्या अगदी आधीच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर सर्टिफिकेट संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ‘जना नायकन’च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला असून, चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजेच, 9 जानेवारीला ‘जना नायकन’ प्रदर्शित होणार नाही.

थलापती विजयच्या (Thalapathy Vijay)‘जना नायकन’ची भारतातील रिलीज अधिकृतपणे स्थगित करण्यात आली आहे. ही घोषणा केव्हीएन प्रोडक्शन्सकडून करण्यात आली आहे. प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर करत विजयच्या चाहत्यांसाठी खास संदेशही दिला आहे. मात्र, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

निर्मात्यांनी जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे—“जड अंतःकरणाने आम्ही आमचे सर्व मान्यवर हितधारक आणि प्रेक्षकांसोबत ही माहिती शेअर करत आहोत. 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जना नायकन’ काही अशा परिस्थितींमुळे पुढे ढकलण्यात आला आहे, या गोष्टि आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. या चित्रपटाबाबत लोकांची उत्सुकता, उत्साह आणि भावना आम्हाला पूर्णपणे समजतात, आणि हा निर्णय आमच्यासाठीही सोपा नव्हता. नव्या रिलीज डेटची घोषणा लवकरच करण्यात येईल. तोपर्यंत, कृपया संयम ठेवा आणि आपले प्रेम कायम ठेवा. तुमचा अखंड पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे आणि ‘जना नायकन’च्या संपूर्ण टीमसाठी त्याचे खूप महत्त्व आहे.”

‘जना नायकन’च्या रिलीज डेटबाबत हा पोस्ट अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा चित्रपटाच्या सर्टिफिकेशन प्रक्रियेत सेन्सॉर बोर्डाकडून विलंब होत आहे. या प्रकरणी निर्मात्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर बुधवारी न्यायालयाने चित्रपटाच्या रिलीजबाबतचा निर्णय सुरक्षित ठेवला असून, सीबीएफसी (केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ) यांना चित्रपटाच्या पुनरावलोकनासाठी नवीन समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

समंथाच्या नवीन तेलुगू चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, अ‍ॅक्शन अवतारात दिसणार अभिनेत्री

हे देखील वाचा