Wednesday, June 26, 2024

‘ही काय पद्धत आहे?’, शुटिंग सेटवर उशिरा पोहोचलेल्या जान्हवी कपूरवर सर्वांसमोर खेकसला वरुण धवन

अनेकदा काही कलाकार शूटसाठी सेटवर उशिरा पोहोचतात. यामुळे चित्रपट निर्मातेही त्यांच्यावर नाराज होतात. नुकतेच जान्हवी कपूरनेही (Janhvi Kapoor) असेच काहीसे केले आहे. जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘बवाल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन (Varun Dhawan) दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जान्हवी कपूर सेटवर उशिरा पोहोचली. यावेळी संपूर्ण टीम तिची वाट पाहत होती. तर वरुण धवनने थेट जान्हवीची शाळा घ्यायला सुरुवात केली.

वरुण आणि जान्हवी सध्या पोलंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. जान्हवी कपूर चित्रपटाच्या सेटवर थोडी उशिरा पोहोचली. यानंतर जान्हवीने उशीरा झाल्याबद्दल निर्मात्यांची माफी मागितली. खरं तर नितेश तिवारी, अश्विनी अय्यर तिवारी आणि वरुण धवन यांच्यासह सर्वजण हॉटेलबाहेर जान्हवीची वाट पाहत होते. जान्हवी ‘मला माफ करा सर, खूप उशीर झाला’ असे म्हणताना दिसली. (janhvi kapoor arrived late for the shooting of movie)

याशिवाय वरुण धवनही जान्हवीची शाळा घेताना दिसला. वरुण म्हणाला, “जान्हवी, ही काय पद्धत आहे?” मात्र वरुण धवन हे सर्व जान्हवीला मजेदार पद्धतीत बोलला. यानंतर वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. वरुण आणि जान्हवी कपूर चित्रपटाच्या सेटवर मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिसून येते.

या चित्रपटाची घोषणा एप्रिलमध्ये झाली होती. पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नितेश तिवारी हा चित्रपट बनवत आहेत. २०१९मध्ये आलेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटासाठी ते विशेषतः ओळखला जातो. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘बवाल’ व्यतिरिक्त वरुण धवन सध्या ‘जुग जुग जिओ’च्या यशाचा आनंद घेत आहे. याशिवाय तो लवकरच ‘भेडिया’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा