अनेक बॉलिवूड स्टार्स क्रिकेटचे चाहते आहेत. इंडियन क्रिकेट टीमला बॉलिवूड स्टार्स चढाओढीने सपोर्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता ‘आयुष्मान खुराना’ हा आपल्या ‘क्रू मेंबर्स’ सोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. तर आता श्रीदेवीची मोठी कन्या व अभिनेत्री जान्हवी कपूर देखील शूटिंगच्या दरम्यान क्रिकेट खेळताना दिसली आहे. आपल्या चित्रपटाच्या स्क्रूबरोबर तीने क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल होत आहे.
बॉलिवूड स्टार्सला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांचं क्रिकेटच टॅलेंट दाखवायला ते विसरत नाहीत. जान्हवी कपूर ही आता चंदिगडमध्ये ‘गूड लक जेरी’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेचा वापर करून तीने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. नामांकित फोटोग्राफर ‘विरल भयानी’ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात जान्हवी क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतेय.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की ,जान्हवी पहिला बॉल मिस करते परंतु नंतरच्या दुसऱ्या ,तिसऱ्या बॉलला ती जोरदार फटका मारते आणि तसेच या दोन फटक्यांचे सेलीब्रेशनही करते. स्क्रू मेंबर्ससोबत क्रिकेट खेळताना जान्हवी खूपच आनंदी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी सलवार सुट घालून आरामात क्रिकेट खेळत आहे.
जान्हवीच्या फॅन्सनी तिच्या या व्हिडिओला खूप पसंती दर्शवली आहे. तिच्या वर्कफ्रंट बोलायचे झाल्यास जान्हवी ‘ धडक ‘ या डेब्यू केला आहे. या चित्रपटात तिने ‘इशान खट्टर’ यांच्यासोबत मुख्य भूमिका निभावली आहे. त्यानंतर तिने ओटीटीवर घोस्ट स्टोरीमध्ये एक चांगली भूमिका निभावून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जान्हवी शेवटची ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीने भारतातील पहिली महिला पायलटची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त जान्हवी करण जौहर यांच्या ‘तख्त ‘या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर ती ‘दोस्ताना 2’, ‘रूही अफजाना’ या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.










