बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अतिशय कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. तिचा निरागस चेहरा आणि बबली स्वभाव तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खूप आवडतो. शूटिंगच्या दरम्यान वेळ मिळाला की, जान्हवी खूप मजा आणि खोडसाळपणा देखील करते. दुसरीकडे, जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेससाठी सगळेच वेडे आहेत. तिचे चाहते सतत तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाऱ्याने उडू लागला जान्हवीचा ड्रेस
समोर आलेल्या जान्हवी कपूरच्या व्हिडिओमध्ये ती कारमधून उतरून इमारतीच्या दिशेने जाताना दिसत आहे. या दरम्यान, पॅपाराजींनी तिला स्पॉट केले. पॅपराजी तिला फोटोसाठी पोझ द्यायला सांगतात, पण अभिनेत्री घाईघाईने निघून जाते. तेव्हा अचानक वाऱ्याचा झोका तिच्या ड्रेसला उडवतो. अशा परिस्थितीत अभिनेत्री घाईघाईत कशीबशी स्वतःला सांभाळते.
जान्हवी ठरली ‘Oops Moment’ची बळी
जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिची खूप टिंगल करत आहेत. पोस्टवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले, “जर तुम्हाला असे कपडे हाताळता येत नाहीत, तर तुम्ही ते का घालता.” त्याचवेळी एका युजरने लिहिले, “मजा येता येता राहिली.” त्याचबरोबर अनेकांनी हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.
या व्हिडिओमध्ये जान्हवीने फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. ही पहिलीच वेळ नाही, तर या आधीही याआधीही जान्हवी अशा गोष्टींची बळी ठरली आहे. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री उप्स मुमेंटच्या बळी ठरल्या आहेत आणि त्याही ट्रोलिंगच्या शिकार झाल्या आहेत.
आगामी चित्रपट
अभिनेत्रीने ‘धडक’ चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात जान्हवी ईशान खट्टरसोबत दिसली होती. तिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर, ती ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रुही’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जेरी’ आणि ‘मिली’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फोटोग्राफर्सने बोनी कपूर यांना मास्क काढून पोझ द्यायला सांगताच, त्यांच्यावर भडकली जान्हवी कपूर
-श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा क्रॉप टॉपमध्ये राडा; एकदा पाहाच तिचे ‘हे’ स्टायलिश फोटोशूट