बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचे काही फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये खुशी आणि जान्हवी एकत्र दिसत आहेत. यामध्ये एक अपरिचित मुलगा देखील दिसतोय, ज्याचा काहीही उल्लेख केलेला नाही. पण फोटो व्हायरल होण्याचे कारण या हा मुलगा नाही, तर भलतेच काहीतरी आहे.
ट्रोल होतायत कपूर बहिणी
फोटो व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे, त्यात जान्हवी कपूरने दिलेली पोझ. यात जान्हवी कपूरने ट्यूब टॉप घातला आहे आणि एक पाय वर केला आहे. तर तिची धाकटी बहीण खुशीने तिच्या पायाचा आधार घेत, पायावर हात आणि चेहरे टेकवून बसली आहे. दोघींनी दिलेली ही पोझ पाहताना खूपच विचित्र वाटत आहे. (janhvi kapoor photos with sister khushi kapoor in bold look getting viral)
आला कमेंट्सचा पूर
त्याहूनही मनोरंजक गोष्ट म्हणजे, जान्हवी कपूरने तिचा ड्रेस मांडीच्या वर सरकवला आहे. जेणेकरून खुशी तिचा हात आणि चेहरा त्यावर ठेवू शकेल. अभिनेत्रीचे हे फोटो तिने व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोला असंख्य चाहत्यांनी लाइक केले आहे, मात्र कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण तिच्या पोझवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या फोटोवर अनेकांनी आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, तर काहींनी विचारले आहे की, ‘अशा पोझची काय गरज होती?’ वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी कपूरच्या करिअरचा आलेख खूप वेगाने वर गेला आहे. ‘धडक’ चित्रपटातून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात ती अभिनेता ईशान खट्टरसोबत दिसली होती. हा चित्रपट ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिरव्या रंगाच्या साडीमध्ये कातिल अदा दाखवताना दिसली जान्हवी कपूर
-काळजात घंटी वाजावी असे फोटो शेअर करत जान्हवीने खास अंदाजात चाहत्यांना म्हटले ‘हॅपी दिवाळी’
-स्वतःला फिट ठेवण्यासाठी जान्हवी घेतेय मोठी मेहनत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल फिदा