Friday, November 14, 2025
Home बॉलीवूड ‘एका कार्यक्रमात सारा हिरोइनसारखे नखरे करत होती’, जान्हवी कपूरने केला खुलासा

‘एका कार्यक्रमात सारा हिरोइनसारखे नखरे करत होती’, जान्हवी कपूरने केला खुलासा

बॉलिवूडची अनेकदा असे म्हटले जाते की, दोन अभिनेत्री कधीही एकमेकींच्या मैत्रिणी असू शकत नाही. मात्र इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्रींची मैत्री प्रसिद्धी आहे. सध्याच्या नव्या पिढीतील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी देखील एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा या दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक कार्यक्रमांना या दोघींना सोबत पाहिले जाते. नुकतेच या दोघी रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये दिसल्या. या शोमध्ये सारा आणि जान्हवी खूप मजामस्ती करताना दिसल्या. या शोमध्ये या दोघींनी बरेच किस्से शेअर केले.

या शो दरम्यान जान्हवीने साराबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी जान्हवीने सांगितले की, जेव्हा तिने पहिल्यांदा साराला पाहिले तेव्हा सारा एखाद्या अभिनेत्री सारखे नखरे करत होती.

सारा आणि जान्हवी या शोमध्ये आल्या आणि शोचा होस्ट असणाऱ्या रणवीर सिंगने त्यांना प्रश्न विचारला की, ‘तुमची मैत्री कशी झाली?’ याचे उत्तर देताना दोघीही एकदम म्हणाल्या, ‘एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून.’ त्यानंतर जान्हवीने एक किस्सा सर्वांना सांगितला. ती म्हणाली, “मी साराला एका कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिले. ती तिच्या आईसोबत आली होती. मी पाहिले की, सारा अमृता सिंग यांच्यासोबत बसली होती आणि सतत हिरोइनसारखे नखरे करत होती. ती ज्या अंदाजमध्ये हे सर्व करत होती, ते पाहून मी विचार केला की मला हिची मैत्रीण व्हायचे आहे.”

साराने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून जान्हवी आणि त्यांच्या मैत्रीचे खूप कौतुक केले. जान्हवीसोबत तिने फोटो शेअर करत लिहिले, “खऱ्या राजकुमारी…एकमेकांचा ताज, मैत्रिणी, प्रेरणा, जिमपासून गाऊनपर्यंत… प्रेम करायचे, हसायचे…!” शोमध्ये जान्हवीने सारा आणि रणवीरला बेली डान्स देखील शिकवला. यावेळी या तिघांनी मस्त बेली डान्स केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी संपवले होते स्वत:चेच कुटुंब, पत्नी अन् मुलीला गोळी मारून केली आत्महत्या

-घटस्फोटानंतर पुरुषांपेक्षा जास्त त्रास महिलांना होतो, म्हणत ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दुःख

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

हे देखील वाचा