Thursday, July 18, 2024

जान्हवी कपूरने बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

आपल्या सौंदर्यामुळे फॅन्सच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर (Janhvi Kapoor). जान्हवी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील खूपच चर्चेत येत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी जान्हवी तिच्या पोस्टच्या माध्यमातून सतत फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या शेअर केलेल्या पोस्ट काही काळातच इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना अनेकदा पाहिले जाते. तिच्या फॅन्सला तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात आणि तशा कमेंट्स देखील तिच्या पोस्टवर फॅन्स करताना दिसतात.

नुकताच जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर करत एका ब्युटी प्रोडक्ट्च्या मदतीने त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती दिली आहे. यासोबत तिने तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे पोस्ट शेअर केले असून, या फोटोंमध्ये ती ब्युटी प्रोडक्ट्चा वापर करताना दिसत आहे. तिच्या याफोटोंसोबत तिने तिचे बिकिनी फोटो (Janhvi Kapoor Bikini Photos) पोस्ट केले असून, तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

जान्हवीची ही पोस्ट आणि फोटो फॅन्स तर फॅन्स कलाकारांना देखील खूप आवडत असून, ते तिचे हे फोटो लाईक्स करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्ट्रॉबेरीसोबत अंडे देखील दिसत आहे. यावरून जान्हवीच्या बहिणीने कमेंट करत तिला विचारले की, “अंड्यांसोबत स्ट्रॉबेरी का खात आहेस?” खुशीच्या या प्रश्नावर जान्हवीचे अजून उत्तर आले नसले तरी तिच्या फॅन्सने हे तिच्या सौंदर्याचे गुपित असेल असे उत्तर खुशीला दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि ख़ुशी कपूरला कोरोना झाला होता. मात्र दोघींनी त्यावर घरीच उपाय घेत यशस्वी मात केली. कोरोना झाल्याचे सांगताना जान्हवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “सुरुवातीचे दोन दिवस खूपच कठीण होते, मात्र त्यानंतर सर्व काही ठीक होण्यास सुरुवात झाली.” यासोबत तिने सर्वांना मास्क घालण्याचा आणि लस घेण्याचा सल्ला दिला होता. जान्हवी कपूर वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना 2’ याशिवाय ती बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘मिली’ सिनेमात दिसणार आहे. तर ख़ुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा जोरदार चालू आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा