Saturday, June 29, 2024

जान्हवी आणि खुशी कपूर होत्या एकाच व्यक्तिच्या प्रेमात वेड्या? जाणून घ्या काय आहे ‘मोठ्या बहिणी’चे उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) तिच्या लूकमुळे चर्चेत असते. जान्हवी कपूर हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ फिल्मी बॅकग्राऊंडमुळे तिला चित्रपट मिळत असल्याचे मानले जात होते, मात्र जान्हवी हा टॅग हटवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच तिच्याबद्दलच्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या अफवाही उडत असतात. जान्हवी अनेक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, पण काही गोष्टी अशा असतात ज्या त्यांना टोचतात. अशीच एक अफवा होती, जिने जान्हवीला त्रास दिला.

जान्हवी कपूरने अलीकडेच माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली. जेव्हा जान्हवीला विचारण्यात आले की, सर्व अफवांमध्ये सर्वात वाईट अफवा कोणती आहे? तर यावर त्याचे म्हणणे होते की मी ऐकले होते की, ‘मी आणि बहीण खुशी कपूर एकाच व्यक्तीला डेट करत आहोत, हे खूप त्रासदायक होते.’ सध्या जान्हवीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे.

जान्हवी पुढे म्हणते की, अफवांच्या बाजारातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे कुटुंब देखील त्यात ओढले जाते. जान्हवी म्हणाली, ‘आम्हा दोघांबद्दल अशी अफवा होती की मी अक्षत राजनला डेट करत आहे आणि त्यानंतर माझे ब्रेकअप झाले आणि मग खुशीने त्याला डेट करायला सुरुवात केली. मी किंवा खुशी दोघांनीही त्याला डेट केले नाही. तो आमचा बालपणीचा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे डेटिंगच्या गोष्टी या केवळ अफवा आहेत.

काही दिवसांपूर्वी अशीही अफवा पसरली होती की, बोनी कपूर जान्हवीला रुपये देऊन चित्रपट मिळवून देतात. जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केला होता. त्यानंतर ती वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमध्ये दिसली. आता ती ‘मिली’ या थ्रिलर चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी कौशल आणि मनोज पाहवा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा-
धर्मेंद्रसमोरच डायरेक्टरने केलेला हेमा मालिनीकडे ‘ही’ मागणी, एका चापटीत चारलेली धूळ
भरत जाधव यांनी संपत्तीबाबत केले मोठं भाष्य; म्हणाले, ‘नवीन जमीन आवडली की….’

हे देखील वाचा