अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आगामी ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीने अलीकडेच सांगितले की, तिचे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या कामात इतके व्यस्त आहेत की, त्यांनी एकाच प्रोजेक्टवर काम केले तरच ते एकत्र वेळ घालवू शकतील. जान्हवीचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) एक चित्रपट निर्माता आहेत, सावत्र भाऊ अर्जुन कपूर (Arjun Kapoor) एक अभिनेता आहे आणि तिची धाकटी बहीण खुशी कपूरही (Khushi Kapoor) तिच्या पहिल्या चित्रपटावर काम करत आहे.
जान्हवी गंमतीने म्हणाली की, हे सर्वजण आपापल्या कामात इतके व्यस्त आहेत की, ती त्यांच्यापैकी कोणासोबतच ती राहू शकत नाही. तिला असा चित्रपट हवा आहे, ज्यात ते सर्व एकत्र काम करू शकतील. त्यासाठी तिने नेपोटिझम हा शब्दही वापरला. (janhvi kapoor wants to do a film with family)
जान्हवीने अलीकडच्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा बोनी यांच्यासोबत ‘मिली’ चित्रपटात एकत्र काम केले होते, तेव्हा तिने तिच्या वडीलांसोबत सर्वाधिक वेळ घालवला होता. हा चित्रपट बोनी कपूरने प्रोड्यूस केला होता आणि जान्हवीने यात काम केले होते. अर्जुन कपूरसोबतही काम करण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता, तिने मजेशीर उत्तर दिले.
अभिनेत्री म्हणाली, “मला आशा आहे. मला खरोखर अशी आशा आहे. मला असे वाटते की, आम्ही सगळे खूप काम करत आहोत. म्हणून एकत्र घालवण्यासाठी आम्हाला वेळ मिळत नाहीये. मला असे वाटते की, मी पापासोबत वेळ घालवला आहे. बहुतेक वेळा मिलीचे शूटिंग करताना एकत्र घालवले होते, कारण आम्ही एकत्र काहीतरी करत होतो. त्यामुळे कुटुंबाला एकत्र आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त एकच चित्रपट करणं, असं मला वाटतं.” पुढे ती हसली आणि म्हणाली, “कदाचित आपण याला नेपोटिझ्म म्हणावे, कारण त्यात एक संपूर्ण कुटुंब आहे. पण हो, मला त्यांच्यासोबत चित्रपट करायला आवडेल.”
जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’
जान्हवीचा पुढचा चित्रपट ‘गुड लक जेरी’ २९ जुलै रोजी Disney+ Hotstar वर रिलीझ होणार आहे. हा नयनतारा आणि योगी बाबू अभिनीत २०१८च्या तमिळ चित्रपट ‘कोलामावू कोकिला’चा रिमेक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










