Saturday, February 21, 2026
Home बॉलीवूड ‘वाह क्या बात है!’ जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

‘वाह क्या बात है!’ जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा जान्हवी कपूर तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत येत असते. ती तिचे वर्कआउट व्हिडिओही शेअर करत असते. तिने नुकताच आता सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे, जो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत तिची आई श्रीदेवीपासून खूप प्रेरित आहे. ती बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी इतर अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देत असते. तिचा आयकॉनिक लूक चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक पाहून केवळ चाहतेच नाही, तर कलाकारही वेडे झाले आहेत.

जान्हवी ग्लॅमरस दिसली लूकमध्ये
जान्हवी कपूरचा या व्हिडिओमध्ये पूलमध्ये सिल्व्हर रंगाच्या स्विमिंग सूटमध्ये पाण्यात पोझ देताना दिसत आहे. केवळ चाहतेच नाही, तर कलाकारही तिची स्तुती करत आहेत. एका युजरने लिहिले की, “स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करून तू आणखी सुंदर दिसत आहेस.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “वाह क्या बात है.”

एका मोठ्या प्रोजेक्टवर जान्हवी कपूर करतेय काम
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘दोस्ताना २’ आणि ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा