बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासह सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. ती नेहमी तिच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधते. चाहते देखील तिने शेअर केलेल्या पोस्टवर हार्ट इमोजीचा वर्षाव करताना दिसतात. तिला आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करायला खूप आवडते. यातच ती स्वतःचा आनंद शोधत असते. नुसतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तुम्ही पाहू शकता की, यामध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात मजा मस्ती करत आहे. आपल्या मैत्रिणींसोबत ती फिरायला गेली आहे. परंतु ती नेमकी कुठे आहे, याबद्दल तिने काही सांगितले नाही. शिवाय फोटोंमध्ये दिसत असलेली दृश्ये मनाला शांत करणारी आहेत. सर्वत्र दाट झाडी आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती मैत्रिणींबरोबर निळीशार खळखळ वाहणाऱ्या एका नदी किनारी बसलेली आहे. तसेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती या पाण्यात पोहताना देखील दिसत आहे.
अभिनेत्रीने या वेळी पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पोपटी रंगाची शॉर्ट पँट घातली आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अनेक पशू पक्षी पाहायला मिळतात. तिने देखील एका सुंदर फुलपाखराचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सिद्धार्थ सेनगुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच ती करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे. तिने खूप कमी वेळात दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशात तिचे सर्व आगामी चित्रपट साल २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा