Tuesday, July 9, 2024

सोनेरी रंगाच्या स्टोन वर्क लेहंग्यात खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य; दिसतेय खूपच सुंदर

बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या जोरदार चर्चेत आहे. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती खूप चर्चेत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो ती अनेक वेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ती प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने या फोटोमध्ये सोनेरी रंगाचा स्टोन वर्क लेहंगा परिधान केला आहे. तसेच तिने डायमंड नेकलेस घातलेला आहे. तसेच कानात लहान स्टोन घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने बाकी कोणतीही हेवी ज्वेलरी परिधान केलेली नाही. (janhvi kapoor’s designer lehenga photo viral on social media)

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या तसेच तिच्या या डिझायनर ड्रेसचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावरील हा सध्या सर्वात ट्रेंडिंग फोटो आहे.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी ती शेवटची ‘रूही’ या चित्रपटात दिसली होती. ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता, पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही. तसेच ती ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा