Wednesday, July 3, 2024

बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी कालावधीत तिचे नाव कमावले आहे. जान्हवी ही चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटो तसेच व्हिडिओ ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील भरपूर असल्याने तिच्या फोटोंना देखील जोरदार प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या भन्नाट व्हायरल होत आहे.

जान्हवीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती ज्यूस काढताना दिसत आहे. तिने दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये तिने अपेक्षा आणि सत्यता दाखवली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी बिकिनी टॉप घालून पोझ देत ज्यूस काढताना दिसत आहे. ती अत्यंत सहज ज्यूस काढत आहे. पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिले तर तिने केसांची वेणी घातलेली आहे. तिने निळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. (janhvi kapoor’s funny video viral on social media)

यासोबत ती पूर्ण ताकद लावून मोसंबीचा ज्यूस काढताना दिसत आहे. यानंतर ती काढलेला ज्युसचा ग्लास हातात घेऊन “दीदी आज एवढाच मिळेल,” असं म्हणते. तिचा हा मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच अनेकजण हसण्याची इमोजी पोस्ट करत आहेत.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी ती शेवटची ‘रूही’ या चित्रपटात दिसली होती. ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता, पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही. तसेच ती ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा