Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘मी कायमच ५० च्या दशकात…’, म्हणत जान्हवी कपूरने शेअर केला तिचा रेट्रो लूकमधला सुंदर फोटो

‘मी कायमच ५० च्या दशकात…’, म्हणत जान्हवी कपूरने शेअर केला तिचा रेट्रो लूकमधला सुंदर फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. जान्हवी सोशल मीडियावर ही सतत सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीचा मोठा चाहता वर्ग आहे. खूप कमी काळात तिने तिचे मोठे प्रस्थ बॉलिवूडमध्ये तयार केले. नुकताच जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचे रेट्रो लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.

बॉलिवूडमध्ये ‘धडक’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी जान्हवी कपूर इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जान्हवीच्या लूक आणि अभिनयाची सतत चर्चा होत असते. सोशल मीडियावर जान्हवी बरीच एक्टिव असते. ती सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या आगामी चित्रपटांची, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच माहिती चाहत्यांना माहिती देत असते. नुकताच जान्हवीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचा रेट्रो लूकमधील फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन जान्हवीने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने सुंदर पांढर्‍या रंगाची साडी नेसली असून, यावर स्ट्रिपी ब्लाऊज घातला आहे ज्यामुळे तीच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. ह्या फोटोसोबत जान्हवीने “मी कायम ५० च्या दशकात जगण्याचा बहाणा करू शकते का?” असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. जान्हवीच्या या लूकने तिच्या चाहत्यांना चांगलच घायाळ केल आहे.

जान्हवीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स आल्या आहेत. या फोटोवर प्रसिद्ध डिझाइनर मनीष मल्होत्राने प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये ‘तुला ४०-५० च्या दशकातील क्लासिक लूकमध्ये पाहायला मला आवडेल’. अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान जान्हवी कपूर ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटात शेवटची दिसून आली होती. यावर्षी मात्र तिचे एका पाठोपाठ एक अनेक चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित’ गुड लक जेरी’ या चित्रपटाचा समावेश आहे त्याचप्रमाणे करण जोहर च्या ‘दोस्ताना 2’ चित्रपटात ही जान्हवी झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा