Monday, July 1, 2024

टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनची लागली लॉटरी, थेट महेश भट्ट यांच्या चित्रपटातून करणार बॉलिवूड पदार्पण

जास्मिन भसीन (Jasmin bhasin)  ही हिंदी टेलिव्हीजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जस्मिन भसीनने ‘टशन-ए-इश्क’, ‘दिल से दिल तक’, ‘दिल तो हॅप्पी है जी’ आणि ‘नागिन 4’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री ‘बिग बॉस 14’ मध्येही दिसली होती. इथून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.  आता जास्मिन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि विक्रम भट्ट यांच्यासोबत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु जास्मिनच्या या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. 

समोर आलेल्या बातम्यांनुसार  जास्मिन भसीन जुलै महिन्यात या चित्रपटाचे  शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाची निर्मिती लोनरंजर आणि झी करत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष चव्हाण करणार आहेत. दिग्दर्शक म्हणून मनीषचा हा पहिलाच चित्रपट असेल. तत्पुर्वी जास्मिन भसीनने अलीकडेच तिचा पंजाबी डेब्यू चित्रपट ‘हनीमून’ चे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यामध्ये गिप्पी ग्रेवाल देखील तिच्यासोबत झळकणार आहे.

जास्मिन भसीनचा ‘हनीमून’ या वर्षी ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो.’बिग बॉस 14′ दरम्यान जस्मिनला चांगलीच पसंती मिळाली होती. पण ती  हा कार्यक्रम जिंकू शकली नाही. मात्र अली गोनी आणि तिची मैत्री प्रेक्षकांना खूप आवडली. दोघांनीही या कार्यक्रमात असतानाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कबुली दिली होती.  इतकेच नव्हेतर या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर दोघेही सुट्टीवरही एकत्र गेले होते.

काही दिवसांपूर्वी अली गोनीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर दोघांच्याही घरच्यांची संमती मिळाली असून त्याआधी आम्ही ऑनलाईन निमंत्रण देत असल्याचे सांगितले होते. दरम्यान अली गोनी आणि जास्मीन दोघेही सध्या आपल्या अभिनय कारकिर्दित चांगलेच यशस्वी होताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा