Sunday, June 22, 2025
Home अन्य बिग बॉसच्या घरात जाण्याआधी जॅस्मिन भसीनने केले होते एक मोठे वक्तव्य; मात्र कालांतराने ठरले ते चुकीचे

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी जॅस्मिन भसीनने केले होते एक मोठे वक्तव्य; मात्र कालांतराने ठरले ते चुकीचे

टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिने अनेक मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. ‘नागीण’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकेत काम केल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली. ती ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील दिसली होती. या शोनंतर ती खूप चर्चेत आली. जॅस्मिन आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २८ जून १९९० मध्ये कोटा येथे झाला होता. बिग बॉस १४ मध्ये जाण्याच्या आधी तिने एक असे वक्तव्य केले होते, जे बिग बॉसच्या घरात जाऊन चुकीचे सिद्ध झाले.

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी जॅस्मिनने टीव्ही ९ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ती सिंगल आहे आणि शोमध्ये देखील सिंगलच राहणार आहे. सोबतच तिने हे देखील सांगितले होते की, तिला बिग बॉसमध्ये प्रेम नाही होऊ शकत. पण नंतर तिचे हे वक्तव्य खोटे सिद्ध झाले.

जॅस्मिन ‘बिग बॉस १४’ मध्ये आल्यानंतर, काही दिवसात अली गोनी तिचा मित्र बनून या शोमध्ये आला होता. तो हा शो सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी जॅस्मिनला सपोर्ट करण्यासाठी आला होता. या शोमध्ये दोघांचा रोमान्स, मस्ती सर्वांना दिसली होती. शोमध्ये दोघे एकमेकांच्या जवळ होते. जॅस्मिनने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, अली आणि ती खूप चांगले मित्र होते. पण या शोमध्ये आल्यावर त्यांना जाणवले की, त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे. ( Jasmin Bhasin claimed to be singel before going to bigg Boss 14)

अली आणि जॅस्मिनला या शोमध्ये त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली होती. त्यानंतर अलीने या शोमध्ये जॅस्मिनला प्रपोज केले होते. तिने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली होती. अलीच्या घरच्यांनी देखील सांगितले होते की, त्यांना ते दोघेही आवडतात.

या शोमधून बाहेर आल्यानंतर देखील त्या दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट केले गेले. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती अलीसोबत गोव्याला गेली आहे. अलीने आज तिच्या वाढदिवसासाठी खास प्लॅन बनवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा विशाल दादलानीने केला होता त्याच्या वाईट सवयीचा खुलासा; एका दिवसाला पित होता ४० सिगारेट, पुढे जे झाले…

-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक

-पहिल्यांदाच आपल्या रेस्टॉरंट ‘सोना’मध्ये गेली प्रियांका चोप्रा; पाणीपुरीचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल

हे देखील वाचा