Saturday, June 29, 2024

Birthday Special : अशी आहे जास्मिन भसीन आणि अली गोनीची लवस्टोरी, वाचा रंजक किस्सा

जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच जास्मीन भसीन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या जास्मीन तिच्या आणि अली गोनीच्या प्रेम प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. बुधवार ( २९ जून ) जास्मीनचा वाढदिवस. जाणून घेऊया तिच्या आणि अली गोनीची न ऐकलेली लवस्टोरी. 

टिव्ही अभिनेत्री जास्मीन भसीनने आपल्या करिअरची सुरूवात ‘टशन ए इश्क’ या मालिकेतून केली होती. आपल्या पहिल्याच मालिकेतून तिने सहजसुंजर अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. या मालिकेने जास्मीनला घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर जास्मीनने ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’, ‘दिल तो हैप्पी है जी’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले होते. त्याचबरोबर तिने खतरों के खिलाडी९ आणि बिग बॉस १४ मधून जोरदार लोकप्रियता मिळवली. आपल्या अभिनयाइतकीच ती प्रेमप्रकरणामुळेही चांगलीच चर्चेत आली होती.

जास्मिन भसीन आणि अली गोनी ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये भेटले होते. या शोपासून दोघांची मैत्रीही सुरू झाली. शोमध्ये त्यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा झाली होती. आपल्या खास मैत्रीमुळे त्याने हेडलाइन्समध्येही आपले स्थान निर्माण केले. त्यावेळी लोकांना वाटले की दोघे एकमेकांना डेट करत आहेत, पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले नाही. बर्‍याच दिवसांनंतर अखेर जास्मिन आणि अली गोनी यांच्यातील खास नाते स्पष्ट झाले. दोघांनीही एकमेकांना शेवटपर्यंत मित्र म्हणून सांगितले होते, पण नंतर दोघांनी  त्यांच्या भावना शेअर केल्या आणि तेव्हापासून त्यांचे नाते प्रसिद्धीच्या झोतात राहिले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806)

 

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत जास्मिनने खुलासा केला होता की, “डेटींगपूर्वी दोघेही 3 वर्षे मित्र होते, मात्र जास्मिनला अलीबद्दल प्रेमाच्या भावना होत्या. त्यांचं प्रेम कॉलेजच्या रोमान्ससारखं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ती 5 वर्षे अलीची वाट पाहू शकते,”असेही तिने सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा