काही वर्षांपूर्वी कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले होते, ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एकच धमाका झाला होता. कंगना रणौतने तिला जावेद अख्तर आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. या प्रकरणावर नुतीच कोर्टात सुनावणी झाली. सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केल्यानंतर तिने हा आरोप केला होता. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. ज्यावर सुनावणी झाली आहे.
एका मोठ्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जावेद अख्तर यांनी कोर्टाला सांगितले, “माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत. मी लखनऊचा असून, तिथे प्रत्येकाला आदरानेच आवाज दिला जातो. एखादी व्यक्ती माझ्यापेक्षा ३०-४० वर्षांनी लहान असली तरीही मी सगळ्यांना तुम्ही म्हणूनच संबोधतो. मी माझ्या वकिलांचा उल्लेख देखील कधी एकेरी केला नाही. माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे.”
पुढे जावेद अख्तर म्हणाले, “कंगना रणौतने फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्यावर हे सर्व आरोप केले आणि काही महिन्यांनी सुशांतचे निधन झाले. त्यानंतर हा मुद्दा चर्चेचा विषय झाला. मी तेव्हा यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावरून बराच गदारोळ झाला आणि तिने मी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला. हे विधान माझ्यासाठी अपमानास्पद होते. एवढेच नाही तर कंगनाने मी सुसाइड ग्रुपचा सदस्य असून लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे देखील म्हटले होते.”
जावेद अख्तर यांनी हे देखील सांगितले की, त्यांना आणि त्यांची पत्नी असलेल्या शबाना आझमी यांना कंगनाची अभिनय खूप आवडतो. त्यासाठी त्यांनी एकदा तिला त्याच्याकडे घरी येण्याचे आमंत्रण देखील दिले होते. आता या प्रकरणावर १२ जूनला पुढची सुनावणी होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…










