बॉलिवूड ही अशी एक इंडस्ट्री आहे जिथे जास्त वय असणारे कलाकार हिरो बनतात, तर कमी वयाच्या अभिनेत्रींना आईची भूमिका साकारावी लागते. काही वेळा अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या वयाच्या अंतरात पण कमालीची तफावत असते. वीस ते पंचवीस वर्षांची अभिनेत्री चाळीस ते पन्नास वयाच्या कलाकारांसोबत काम करताना इथे सर्रास पाहायला मिळते. काही वेळा तर अशा लहान वयाच्या अभिनेत्री आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या अभिनेत्यासोबत बोल्ड सीन शूट करताना देखील दिसल्या आहेत. त्यामुळे कित्येकदा हे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अशाच एका चित्रपटापैकी एक चित्रपट म्हणजे ‘निशब्द.’
अमिताभ बच्चन यांनी आजगायत अनेक चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यातील त्यांचे अनेक चित्रपट विशेष गाजले आहेत. आपल्या प्रत्येक चित्रपटात ते मोलाची भूमिका साकारत असतात. मग ते कोणतेही पात्र असो. प्रत्येक पात्रात ते आपल्या अभियाची छाप पडताना दिसत असतात. पण त्यांचे असे अनेक चित्रपट देखील आहेत जे विशेष गाजले नाहीत, उलट वादाच्या भोवऱ्यात अधिकच अडकले होते. त्यांनी साकारलेला हा निशब्द चित्रपट. त्यांच्या या चित्रपटात अभिनेत्री जिया खान ही प्रमुख भूमिकेत होती.
निशब्द या चित्रपटाच्या पटकथा आणि प्रणयरम्य दृश्यांमुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर तितकी चालली नाही. राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. ज्यात अभिनेत्री जिया खान ही आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या तरुणासोबत रोमांस करताना दिसत आहे. त्यात अमिताभ यांनी जिया खान सोबत बरेच बोल्ड सीन चित्रीत केले आहेत. २००७ साली हा चित्रपट बनवला गेला होता. या चित्रपटाची कथा ही लोलिता आणि अमेरिकन ब्युटी या हॉलिवूडच्या वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटाशी संबंधित आहे.
हा चित्रपट केवळ वीस दिवसात चित्रित झाला आहे. या चित्रपटात दाखवले गेले आहे की अमिताभ बच्चन हे विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. जिया खान ही त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीच्या रुपात चित्रपटात दिसून आली. अमिताभ तिच्याकडे आकर्षित होत आहेत. दरम्याम त्या दोघांत अनेक लव्ह मेकिंग सीन सूट केले गेले, जे प्रेक्षकांना अजिबात आवडले नव्हते. त्यांची पत्नी जया बच्चन यांनी देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती. एका वयोवृद्ध व्यक्तीने ऐन तारुण्यातल्या मुलीच्या प्रेमात पडण्याच्या कथानकाला पसंतीचा सूर काही गवसला नाही. त्यामुळे निशब्दची जादू प्रेक्षकांवर चालली नाही.
या चित्रपटात अमिताभ आणि जियाच्या लिपलॉक सीनने सर्वाधिक खळबळ माजवली होती. त्यामुळे जया बच्चन त्यांच्यावर प्रचंड चिडल्या होत्या. या चित्रपटानंतर त्यांनी असे दृश्य करण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या वादातून बाहेर पडायला त्यांना फार वेळ लागला होता.
https://youtu.be/j8DKgJAscC8
अमिताभ यांना आग आणि निशब्द या चित्रपटात घेऊन त्यांनी मोठी चूक केली आहे, असे या चित्रपटाचे निर्माते राम गोपाल वर्मा यांनी सांगितले होते. ‘निशब्द’ या चित्रपटाप्रमाणेच अमिताभ यांचे ‘बुम’ आणि ‘अजूबा’ हे चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर योग्य कामगिरी करू शकले नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?