बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली आहे. काही जण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. यातीलच एक म्हणजे जया बच्चन. जया बच्चन या महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. अनेकदा त्यांच्या बाबतीत काही किस्से आणि माहिती व्हायरल होत असते. हरिवंशराय बच्चन यांचा सोमवारी (दि. 27 नाेव्हेंबर)ला जयंती आहे. चला तर या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या मुलाची लव्ह स्टाेरी…
यात बिग बी यांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा माझं आणि जयाचं लग्न ठरलं होतं, तेव्हा मी जेवीपीडी स्कीम सोसायटीच्या 7 नंबरच्या रस्त्यावर एका भाड्याच्या घरात राहतो होतो. ज्याचं नाव ‘मंगल’ असं होतं. आमचं लग्न अगदीच साध्या पद्धतीने झाले होते. आमच्या दोन कुटुंबांच्या उपस्थितीतच आमचं लग्न पार पडलं होतं. त्यांनतर आम्ही दोघे लंडनला गेलो. ही फक्त माझ्यासाठीचा पहिला प्रवास नव्हता, तर जया देखील पहिल्याच वेळेस लंडनला जात होती.”
“या आधी आमचा चित्रपट ‘जंजीर’ याला चांगलंच यश मिळालं होतं. यादरम्यान आमच्या सगळ्या मित्रांनी असं ठरवलं होतं की, जर हा चित्रपट चांगला प्रदर्शित झाला, तर आपण सगळे लंडनला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाऊ. आम्ही सगळे लंडनला जात आहोत हे सांगण्यासाठी आणि परवानगी घेण्यासाठी बाबूजींकडे गेलो, तेव्हा त्यांनी मला तिथेच प्रश्न विचारला की, ‘तुझ्यासोबत अजून कोण कोण जात आहेत?’ त्यावेळी मी त्यांना तिकडे कोण कोण जाणार आहोत त्या सगळ्यांची नावे सांगितली,” असे बिग बी म्हणाले.
पुढे बोलताना बिग बी म्हणाले की, “त्यानंतर परत त्यांनी सांगितले की, ‘तुझ्यासोबत जया देखील येणार आहे. तुम्ही दोघे तिकडे जाणार आहात.’ त्यावर मी त्यांना ‘हो’, असे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘जर तुम्हाला दोघांना सोबत लंडनला जायचे असेल, तर आधी लग्न करा आणि मग एकत्र लंडनला जा.’ त्यावर मी ‘ओके’ असं उत्तर दिलं. ”
“त्यानंतर लगेचच ब्राह्मणाला आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांना सांगितले गेले. लवकरात लवकर लग्ननाची सगळी तयारी केली गेली. त्याच रात्री आमची लंडनची फ्लाईट होती. फ्लाईटच्या आधी लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करायच्या होत्या. मलबार हिलवर आमच्या लग्नाचं स्थळ फिक्स झालं होतं. तिथेच जयाची एक मैत्रीण देखील राहत होती. आणि तिथेच लग्नाच्या सगळ्या विधी होणार होत्या. मी पारंपारिक पोषाख घालून स्वतःच्या लग्नाला जाण्यासाठी तयार झालो. तिथे जाण्यासाठी मी ड्रायव्हिंग सिटवर बसलो. गाडी चालवायला तयार झालो,” असे त्यांनी पुढे म्हटले.
“हे बघून माझा ड्रायवर नागेशने मला ड्रायव्हिंग सिटवरून मागे ओढले आणि म्हणाला, ‘लग्नाच्या स्थळापर्यंत गाडी चालवत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे.’ अशा प्रकारे तेव्हा ती गाडीच आमच्यासाठी नवरदेवाचा घोडा म्हणून होती. जेव्हा आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा नेमका पाऊस पडायला लागला. त्यावेळी आमच्या शेजारचे आमच्या जवळ आले आणि म्हणाले, ‘पाऊस हा एक चांगला संकेत असतो, तुम्ही लवकर लग्न आटपून घ्या.’ त्यानंतर काही वेळातच आमचं लग्न झालं आणि आम्ही अधिकृत मिस्टर आणि मिसेस बच्चन झालो,” असे त्यांनी आपल्या लग्नाबद्दल बोलताना पुढे म्हटले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
–गुलाबाचे फुल हातात घेऊन रिंकूने दिल्या भन्नाट पोझ; पाहा फोटो
–अय्याे! अमिताभ बच्चन यांनी चक्क वडिलांना विचारला हाेता प्रश्न, ‘मला का जन्माला घातले?’