Friday, April 11, 2025
Home टेलिव्हिजन ‘प्रतिमेला शोभणारा नाही’ म्हणत जया बच्चन यांनी दिला होता अमिताभ बच्चन यांना KBC साठी नकार

‘प्रतिमेला शोभणारा नाही’ म्हणत जया बच्चन यांनी दिला होता अमिताभ बच्चन यांना KBC साठी नकार

हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अमिताभ बच्चन यांना अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या प्रतिभेने गेली अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि आजही ते करत आहे. अमिताभ बच्चन यांच्या करियरमधील मैलाचा दगड म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ शो. या शोने त्यांच्या प्रवाळ एक मोठे, सुखद आणि यशस्वी वळण तर दिलेच सोबतच त्यांच्या लोकप्रियतेत अधिक भर देखील घातली. आज कौन बनेगा करोडपती या शोचा चेहरा म्हणून बच्चन यांना ओळखले जाते. मात्र एक गरज म्हणून त्यांनी हा शो करायला होकार दिला होता. त्यांची पत्नी असलेल्या जया यांची देखील इच्छा नव्हती की अमितजींनी हा शो करावा.

अमिताभ बच्चन यांनी २००० सालापासून ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करायला सुरुवात केली. त्याकाळी ते बॉलिवूडसोडून किंवा बॉलिवूडसोबतच टीव्ही क्षेत्रात पदार्पण करणारे आणि करियरमध्ये रिस्क घेणारे पहिले अभिनेता देखील ठरले. त्यांचे टीव्हीवर येणे अनेकांना रुचले नाही आणि त्यांना ट्रोल देखील केले गेले. एवढेच काय तर जया बच्चन यांनी देखील अमिताभ बच्चन यांना त्यांनी हा शो होस्ट करू नये असे सांगितले होते. मात्र अमिताभ यांनी त्यांच्या मनाचे ऐकले आणि रिस्क घेत शोला होकार दिला. हा होकार देखील त्यांनी नाइलाज म्हणून दिला होता. कारण त्यांचे सिनेमे फ्लॉप होत होते आणि ऑफर देखील मिळणे कमी झाले होते.

amitabh bacchan
Photo Courtesy twitterAmitabh Bachchan
SrBachchan

जया बच्चन यांनी स्वतः याचा एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. त्या म्हणाल्या की, “अमिताभ यांनी केबीसी करु नये असे मला सतत वाटत होते. कारण, त्यांनी मोठ्या पडद्यावर जे नाव कमावले त्याला आणि त्यांची प्रतिमा याला हा शो शोभणारा नव्हता असे मला वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तर उलटच झाले हा शो अपेक्षेपेक्षा अधिक जास्त गाजला”,

दरम्यान कौन बनेगा करोडपतीने २०२१ साली त्यांचे १००० भाग पूर्ण केले. यावेळी अमिताभ म्हणाले होते की, त्यांना वाटले नव्हते हा शो एवढा गाजेल. चित्रपटांमधून टीव्हीवर येताना अनेकांनी त्यांना वेड्यात देखील काढले होते. मात्र त्यांची आर्थिक आणि करियरची परिस्थिती बघता त्यांना हा शो करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. केबीसीचे आतापर्यंत १४ पर्व पार पडले आहेत. या शोमध्ये आतापर्यंत अनेकांना भाग घेतला असून कित्येकांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा