Tuesday, July 9, 2024

मीडियाचे कॅमेरे बघताच चढला जया बच्चन यांचा पारा म्हणाल्या, ‘नोकरीवरून काढा…’

कलाकार नेहमीच पापराजींच्या नजरेत असतात. कलाकार आणि पापाराजी यांचे देखील अनोखे नाते आहे. दोघांचेही एकमेकांशिवाय काही होत नाही. मात्र कधी कधी काही कारणांवरून अनेकदा कलाकार आणि पापराजींमध्ये वाद होतो, काही कलाकार पापराजींवर चिडतात. याच्या अनेक घटना किस्से बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये प्रसिद्ध आहेत. पापराजींवर सर्वात जास्त चिडणाऱ्या कलाकारांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो अभिनेत्री जया बच्चन यांचा. जया बच्चन यांना अनेकदा मीडियासोबत वाद घालताना पाहण्यात आले आहे. त्या अनेकदा मीडियावर चिडत असतात. आता पुन्हा एकदा जया बच्चन यांनी मीडियावर त्यांचा रोष व्यक्त केला आहे.

अभिनेत्री आणि राजकारणी असलेल्या जया बच्चन यांना पाहिले की मीडिया त्यांना घेरते. जया या मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये बऱ्यापैकी कमी कैद होतात, त्यामुळे त्या जेव्हा दिसतात तेव्हा मीडिया खुश असते. आज जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना पापाराजीनी घेरले आणि पुन्हा त्या त्यांच्यावर चिडल्या. अमिताभ आणि जया बच्चन यांना आक इंदोर एयरपोर्टवर पाहिले गेले. मग काय महानायक म्हटल्यावर पापराजी येणारच ना! आणि झाले देखील तसेच मीडिया आली. जया आणि अमिताभ बच्चन यांना घ्यायला आलेल्या लोकांनी त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना पाहून पापाराजीनी त्यांना कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यास सुरुवात केली. जया बच्चन यांनी जसे कॅमेरे पाहिले तशा त्या भडकल्या आणि म्हणाल्या, “कृपया माझे फोटो काढू नका कृपया नको. इंग्लिश समजत नाही का?” त्यानंतर तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आणि गार्डने मीडियाला बाजूला सारले आणि त्यांचे कॅमेरे खाली केले. तेव्हा एयरपोर्टवरून बाहेर पडताना जया म्हणाल्या, “अशा लोकांना नोकरीतून काढून टाकायला पाहिजे.”

हर सर्व चालू असताना अमिताभ जया यांच्या मागे होते, मात्र त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि ते खाली बघत जया यांच्या मागे निघून गेले. याआधी देखील अनेकदा जया बच्चन यांनी पापराजींवर त्यांचा राग काढला आहे. त्यांना अजिबात आवडत नाही, जेव्हा त्या बाहेर पडता तेव्हा त्यांचे कोणी फोटो काढले तर.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती

हे देखील वाचा