Thursday, July 18, 2024

बिग बींसोबत लग्न करण्यासाठी जया बच्चनने ठेवली होती ‘ही’ अट, रिलेशनबाबतही केलं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन(Jaya Bachchan) आणि अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. पुढच्यावर्षी त्यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण होतील. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टदरम्यान जया बच्चन यांनी अमिताभ बच्चननी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी ठेवलेल्या अटींचा खुलासा केला. ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टवर तिच्या नातवासोबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, कारण तोपर्यंत कामाचा ताण कमी होणार होता. त्यावेळी बिग बी म्हणाले,’मला अशी पत्नी पाहिजे, जी 9 ते 5 वेळेतच काम करेल. तुला दररोज काम करण्याची गरज नाही.’

अमिताभ बोलले होते की तू तुझे प्रोजेक्ट्स योग्य व्यक्तींसोबतच केले पाहिजेस असे सांगितले. या पॉडकास्ट मध्ये जय बच्चन यांना नातीने विचारले, की आजोबांनी तुम्हाला कसे प्रपोज केले होते. त्यावेळी जया यांनी काही खास किस्से सांगितले आणि त्याचसोबतचं त्यांनी जूनमध्ये लग्न का केले आणि ऑक्टोबरमध्ये का नाही हेही सांगितले. आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं आमच्या जंजीर चित्रपटाच्या यशानंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी फिरायला जायचं, परंतु बिग बींच्या पालकांनी सांगितले की जर तुला जयासोबत फिरायसा जायचे तर तिच्याशी लग्न करावे लागेल आणि मग जा. त्यामुळे ऑक्टोबर येण्यापूर्वीच त्यांनी जूनमध्ये लग्न केले.त्यानुसार आम्ही ठरलेल्या तारखेच्या आधीच लग्न केलं.

अमिताभ आणि जया पुढील वर्षी त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 3 जून 1953 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकली. जयाची मोठी मुलगी श्वेता बच्चन हिच्यासोबत ‘मॉडर्न लव्ह: रोमान्स अँड रिग्रेट्स’ या विषयावर पॉडकास्टवर बोलले. जया यांनी संवादादरम्यान खुलासा केला की, जर तिची नात नव्या नंदा लग्न न करता आई झाली तर मला कोणतीही अडचण नाही.

अभिनेत्रीने सांगितले की, “आम्ही ज्या काळात मोठे झालो, त्यावेळी हे सर्व आम्ही नाही करू शकलो. आमच्यानंतर श्वेताच्या पिढीतल्यांनाही नात्यामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही. कदाचित लोकांना माझं बोलणं चुकीचं वाटेल. पण शारीरिक आकर्षण अनुरुपता नात्यासाठी महत्त्वाची असते. पण आजच्या पिढीकडे ती संधी आहे. त्यांनी ते करायला हवं कारण एखादं नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. एखाद्या नात्यात शरीरसंबंध नसतील तर ते नातं फार काळ टिकत नाही. तुम्ही केवळ प्रेम, ताजी हवा आणि तडजोडीवर तुमचं नातं टिकवून ठेवू शकत नाही.”

कामाबद्दल बोलाचं झालं तर, जया पुढे दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हद्दच झाली राव! सुरू झाले अल्लू अर्जुनच्या नावाचे ज्यूसचे दुकान, व्हिडिओ पाहाच

आमिरच्या आईला हृदयविकाराचा झटका, ‘या’ हॉस्पिटलमध्ये तातडीने केलं दाखल

हे देखील वाचा