Saturday, July 6, 2024

Jaya Bachchan : ‘माझं ते स्वप्न अपूर्णच…’ वयाच्या ७५ व्या वर्षी जया बच्चन यांनी व्यक्त केली खंत

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन या कधी राज्यसभेत मांडलेल्या मतामुळं तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका पॉडकास्टद्वारे त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल खंत व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जय बच्चन (Jaya Bachchan)यांनी मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा या दोघी ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकतंच या दुसरा सीझन प्रदर्शित झाला. या सीझनमध्ये जया बच्चन यांनी हजेरी लावली होती.

या पॉडकास्टमध्ये जय बच्चन यांनी स्त्री पुरुष समानतेवर भाष्य केलं. तसेच, विविध गोष्टींवर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अभिनय क्षेत्रात नव्हे तर सैन्यात जायचं होतं हे स्पष्ट केलं, पण त्यावेळी समाजातील लोकांचे विचार आणि स्त्री-पुरुष यांच्यात केला जाणारा भेदभाव यामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्त केली.

“मला अजूनही आठवतंय त्यावेळी मला सैन्यात भरती व्हायचं होतं, पण मला ते जमलं नाही ज्यामुळे मी खूप निराश झाले होते. त्यावेळी सैन्यात महिलांना केवळ नर्स म्हणूनच भरती केलं जायचं. अभिनयापेक्षा मला सैन्यात भरती होण्याचे तेव्हा वेध लागले होते.” अशी मनातील खंत जया बच्चन (Jaya Bachchan)यांनी पॉडकास्टद्वारे बोलून दाखवली.

श्वेता बच्चननेही स्त्री-पुरुष यांच्यात होणाऱ्या भेदभावावर भाष्य केलं. आता मात्र चित्र बदलत आहे, आता एखाद्या कारमध्ये पुरुष बसला असेल अन् स्त्री कार चालवत असेल हे चित्र फार सामान्य मानलं जातं. असं मत श्वेता बच्चनने यावेळी मांडलं.

वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा तुटले टॉम क्रूझचे हृदय, 25 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप

महाराष्ट्रातील प्रेक्षक हा खडूस…; ‘महाराष्ट्र भूषण’ स्वीकारताना अशोक सराफ असं का म्हणाले?

हे देखील वाचा