Thursday, April 25, 2024

तीन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीबरोबर जया प्रदांनी केले होते लग्न, ना मिळाला पत्नीचा दर्जा ना बनू शकल्या आई

जेव्हा जेव्हा बॉलिवूडच्या ७०/८० दशकाच्या काळाची चर्चा होते तेव्हा तेव्हा जया प्रदा यांचे नाव नक्कीच घेतले जाते. जया यांनी हिंदी सिनेसृष्टीचा एका काळ त्यांच्या अभिनयाने आणि डान्सने जबरदस्त गाजवला होता. दाक्षिणात्य चित्रपटांपासून हिंदी चित्रपटांपर्यंत त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले. जया यांनी राजकारणातही त्यांची यशस्वी इंनिग सुरु आहे.

सौंदर्याची खाण असलेल्या जया प्रदा यांनी तेलगू चित्रपटांपासून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली, मात्र त्यांना खरी ओळख हिंदी चित्रपटांपासून मिळाली. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना शाळेच्या वार्षिक समारंभात डान्स करताना पाहून दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी अनेक एक से बढकर एक हिट सिनेमे दिले आणि स्वतःला यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत प्रवेश केला. चित्रपटांमध्ये त्यांना भरपूर यश मिळाले, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरल्या.

जया प्रदा यांनी १९८६ साली चित्रपट निर्माता श्रीकांत नाहाटा यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी जया यांच्या या लग्नाव्रुन खूप वादंग उठले होते. असे म्हणतात की, श्रीकांत यांनी जया यांच्यासोबत लग्न तर केले, मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीला त्यांनी घटस्फोट दिला नव्हता. लग्नानंतरही जया यांना कधीही पत्नीचा दर्जा मिळाला नाही. श्रीकांत यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले होती. पण जया यांना स्वतःचे मूल नव्हते. त्यांना मूल पाहिजे होते, मात्र श्रीकांत यांना मूल नको होते, म्हणून जया यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले.

त्यानंतर १९९४ साली जयाप्रदा यांनी ‘तेलुगु देशम पार्टी’ मध्ये प्रवेश करत, राजकारणात प्रवेश केला. १९९६ साली ‘तेलुगु देशम पार्टी’ने त्यांना राज्यसभा सदस्य बनवले. जेव्हा त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा राज्यसभा सांसद बनवण्याचे ठरले तेव्हा त्या नाराज झाल्या आणि २००४ साली त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रामपूरमधून दोनवेळा त्या लोकसभा सदस्य बनल्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला, आणि २०१९ साली रामपूरमधूनच त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, मात्र त्या ही निवडणूक हरल्या.  असे असले तरीही जया प्रदा आज भारतीय राजकारणातले मोठे नाव आहे.

हे देखील वाचा