अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) चाहत्यांना ज्या चित्रपटाची उत्सुकता लागली होती त्या बहुचर्चित ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगची दमदार भूमिका पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर खूपच आवडला असून अवघ्या काही तासात हा ट्रेलर हजारो लोकांनी पाहिला आहे. चित्रपट १३ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांना आणि सिनेरसिकांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘जयेशभाई’ जोरदार चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरची सुरुवात एका मुलीने गावच्या सरपंचासमोर केलेल्या तक्रारीने होत आहे. की मुले शाळेसमोर दारू पिऊन मुलींची छेड काढतात. त्यामुळे तुम्ही दारू पिणे बंद करा. अशी विनंती करताना दिसत आहे. यावर अभिनेते बोमन इराणी यांचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या चित्रपटात रणवीर सिंगने एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तो लवकरच दुसऱ्यांदा पिता होणार आहे. दुसऱ्यांदा मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी तो लिंग चाचणी करतो.संपूर्ण चित्रपट याच कथेवर आधारित आहे. सामाजिक संदेशासह चित्रपटात विनोदाचाही चांगलाच तडका पाहायला मिळणार आहे.
दरम्यान हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे लोकांना हसवता हसवता सामाजिक संदेश देणार आहे. चित्रपटाची कथा गुजराती पार्श्वभूमीवर आधारित आहे, त्यामुळे बोमन इराणीही गुजराती भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर आहेत. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. आता हा चित्रपट सिनेमागृहात किती धुमाकूळ घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात शालिनीव पांडे, रणवीर सिंग, दिक्षा जोशी, अपापशक्ती खुराना असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा