Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड लेखक जयप्रकाश चौकसे यांचा ८२ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू, सोशल मीडियावर वाहिली जातीये श्रद्धांजली

लेखक जयप्रकाश चौकसे यांचा ८२ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू, सोशल मीडियावर वाहिली जातीये श्रद्धांजली

चित्रपट लेखक आणि समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचे इंदोरमध्ये बुधवारी (२ मार्च) रोजी ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना फुफुसंचा कर्करोग झाला होता. त्यांचा मुलगा राजू चौकसे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, घरात आराम करत असताना त्याच्या वडिलांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यांची पत्नी डॉक्टर असल्याने तिने लगेच उपचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा समजले की, त्यांचा मृत्यू झाला आहे.

राजू चौकसेने सांगितले की, त्याचा वडिलांना मागील तीन वर्षापासून कर्करोग झाला आहे आणि मागील काही महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. जयप्रकाश चौकसे यांनी ‘शायद’, ‘कतल’ आणि ‘बॉडीगार्ड’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी महाभारत या मालिकेचे काही प्रमाणात लेखन देखील केले आहे.

चौकसे यांनी हिंदी न्यूजपेपर दैनिक भास्करमध्ये तब्बल २६ वर्ष ‘परदे के पीछे’ या शीर्षकासठी रोज स्तंभलेख लिहिले आहे. त्यामध्ये ते अनेक गोष्टींची चर्चा करत होते. त्यांनी त्यांच्या मृत्युच्या ५ दिवस आधी त्यांचा शेवटचा स्तंभ लेख लिहिला. ते सेंट्रल सर्किट सिने एसोसीएशनचे अध्यक्ष देखील होते.

त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील व्यक्ती शोक व्यक्त करू आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा