Friday, January 24, 2025
Home बॉलीवूड अखेर बंद झाला फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’; प्रियांका चोप्राने केला खुलासा…

अखेर बंद झाला फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’; प्रियांका चोप्राने केला खुलासा…

आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांचे चाहते या तिघांच्या ‘जी ले जरा‘ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. २०२१ मध्ये या चित्रपटाबाबत घोषणा करण्यात आली होती. आता हा चित्रपट बनणार नसल्याचे ऐकायला मिळत आहे. नुकतेच प्रियंका चोप्राला एका मुलाखतीत ‘जी ले जरा’ या चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने चित्रपट बंद झाल्याची सत्यता सिद्ध होत असल्याचे दिसून आले.

फरहान अख्तरचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या एक्सेल एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच प्रियंका चोप्राला ‘जी ले जरा’ या चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिचे उत्तर होते की, तुम्हाला याबाबत फरहान अख्तरशी बोलावे लागेल. याशिवाय तीने या चित्रपटाबद्दल एक शब्दही बोलला नाही. कदाचित प्रियांकालाही माहित नसेल की हा चित्रपट बनणार की नाही, त्यामुळेच ती यावर जास्त बोलणे टाळत आहे.

प्रियांका पुढे म्हणते, ‘मी अनेक निर्मात्यांना भेटते, कथा वाचते. मी हिंदी चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारच्या भूमिकेच्या शोधात आहे. मी या वर्षी खूप व्यस्त असेल.’ अशातच प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आलिया भट्टनेही ‘जी ले जरा’ चित्रपटाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत हा चित्रपट करण्याची तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले. प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्यासोबत झळकल्यानंतर फरहान अख्तर हा चित्रपट करण्याबाबत पुन्हा विचार करेल अशी शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सौदी अरेबिया साठी पुष्पा २ मधून काढून टाकला गेला हा धार्मिक सीन; कारण जाणून व्हाल चकित…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा