Wednesday, July 3, 2024

‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग पडली ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील जीव झाला येडापिसा ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मालिकेत शिवा आणि सिद्धीची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. सध्या मालिका सध्या बंद असली तरी मालिकेतील कलाकारांबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अशीच बातमी सध्या मालिकेत शिवा दादाच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सोनीबद्दल म्हणजेच शर्वरी जोगबद्दल समोर आलेली पाहायला मिळत आहे. काय आहे ती बातमी चला जाणून घेऊ. 

शर्वरी जोग ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शर्वरीला जीव झाला वेडापिसा मालिकेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. मालिकेतील तिने साकारलेली सोनीची भूमिका प्रचंड गाजली होती. अलिकडेच सोनी म्हणजेच शर्वरी जोगने आपल्या प्रेमाची सोशल मीडियावरुन जाहीर कबुली दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by sharvari jog???? (@sharvari_jog)

 

अभिनेत्री शर्वरी जोग ही मराठी अभिनेता गौरव मालणकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. शर्वरी प्रमाणेच गौरवही मराठी सिने जगतात अभिनेता असून त्याने फुलपाखरु या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. शर्वरी आणि गौरवचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक कलाकार आपले प्रेमप्रकरण लपवण्याचा प्रयत्न करत असताना शर्वरी आणि गौरवने मात्र त्यांचे नाते नेहमीच जगजाहीर केले आहे.

दरम्यान मुळची कोल्हापूरची असलेल्या शर्वरी जोगला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. मालिकेत काम करण्याआधी तिने प्रायोगिक तसेच अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. मालिकेप्रमाणेच शर्वरीने विधीलिखीत या वेबसिरीजमध्येही झळकली आहे.

हे देखील वाचा