Thursday, April 25, 2024

वडिलांच्या श्रीमंतीला लाथ मारून जेनिफर केंडलने केलेला शशी कपूर यांच्याशी पळून जाऊन विवाह

जेनिफर केंडल म्हणजेच जेनिफर कपूरचा जन्म 28 फेब्रुवारी 1933 रोजी साउथपोर्ट, युनायटेड किंगडम येथे झाला. जेनिफर केंडल ही शशी कपूर (यांची पत्नी होती आणि तिनेच पृथ्वी थिएटरची पायाभरणी केली होती. म्हणूनच जेनिफर ही देश-विदेशातील सुप्रसिद्ध पृथ्वी थिएटरची संस्थापक असल्याचे म्हटले जाते. अमरीश पुरीपासून नसरुद्दीन शहांपर्यंत अनेक नावाजलेले अभिनेते या रंगभूमीने इंडस्ट्रीला दिले आहेत. 7 सप्टेंबर 1984 रोजी लंडनमध्ये कर्करोगामुळे जेनिफर कपूरचे निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

1956 मध्ये, जेनिफर केंडल तिच्या मैत्रिणीसोबत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये वॉल हे नाटक पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी शशी कपूर 18 वर्षांचे होते आणि नाटक सुरू होण्याआधी, जेव्हा त्यांनी स्क्रीनवरून लोकांना पाहण्यासाठी पाहिले तेव्हा त्यांची नजर जेनिफरवर पडली. जेनिफरला पाहताच शशी कपूर यांचे मन हरपले. काही काळानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले.

1958 मध्ये जेनिफरने वडिलांचे घर सोडले आणि स्वतःहून तीन वर्षांनी लहान असलेल्या शशी कपूर यांच्याशी लग्न केले. कपूर कुटुंब आणि जेनिफरचे वडील दोघेही या लग्नाच्या विरोधात होते. शशी कपूर हे कपूर कुटुंबातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी परदेशी मुलीशी लग्न केले होते. जेनिफरने तिचे वडील जेफ्री केंडल यांचा थिएटर ग्रुप देखील सोडला. त्यात ती मुख्य अभिनेत्री होती. मात्र, काही काळानंतर कपूर कुटुंबाने हे नाते स्वीकारले. त्यांना करण, कुणाल आणि संजना ही तीन मुले आहेत.

जेनिफर आणि शशी कपूर दोघेही थिएटरच्या पार्श्वभूमीचे होते, त्यामुळे दोघांनी पृथ्वी थिएटरचा पाया घातला. शशी कपूर इंडस्ट्रीत मग्न होते, त्यामुळे ते कामात व्यस्त झाले आणि जेनिफरला वेळ देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत दोघांमधील अंतर वाढू लागले. तेव्हापासून जेनिफर कपूरने तिचे सर्व लक्ष पृथ्वी थिएटरमध्येच केंद्रित करायला सुरुवात केली. पण काही काळानंतर 1982 मध्ये जेनिफरला कॅन्सर झाल्याचे कळले. शशी कपूर यांनी त्यांच्यावर मुंबई ते लंडन येथे उपचार केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

यानंतर, जेनिफर तिच्या शेवटच्या क्षणी ब्रिटनमध्ये तिच्या पालकांसोबत राहिली. दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिल्यानंतर 7 डिसेंबर 1984 रोजी जेनिफरचा मृत्यू झाला. शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर याने वडिलांच्या चरित्रात सांगितले की, जेनिफरच्या मृत्यूनंतर शशी कपूर यांचे आयुष्य ठप्प झाले. जेनिफरच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा शशी कपूर समुद्रकिनारी बोटीने गोव्यात लांब गेले होते तेव्हा ते रडले.

हेही वाचा-
ओटीटी क्वीन असणाऱ्या राधिका आपटेने ‘या’ कारणामुळे लग्नात घातलेली फाटकी साडी, वाचाच

प्रियांका ‘मिस वर्ल्ड’ बनलेली, तेव्हा निकला मिशाही नव्हत्या फुटल्या; पाहा त्यावेळी कसा दिसायचा तिचा पती
’हेरा फेरी 3’ अन् ‘वेलकम 3’ सिनेमांबद्दल माेठी अपडेट! वाचून तुम्हीही आनंदाने माराल उड्या

हे देखील वाचा