Friday, May 9, 2025
Home हॉलीवूड हॉलिवूडमधील लोकप्रिय कपल जेनिफर लॉरेंस आणि कुक मारोनी झाले आईबाबा

हॉलिवूडमधील लोकप्रिय कपल जेनिफर लॉरेंस आणि कुक मारोनी झाले आईबाबा

हॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जेनिफर लॉरेंस ओळखली जाते. तिने तिच्या ऍक्शन सीन्समुळे आणि अभिनयाच्या कौशल्यामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. हॉलीवूडसोबतच संपूर्ण जगात तिची एक ओळख आहे. बॉलिवूडमध्ये देखील तिचे खूप चाहते आहेत. अतिशय गरीब कुटुंबातून येत तिने स्वतःची एक वेगळी ओळख इथे निर्माण केली. चित्रपटांमध्ये अनेक भूमिका निभावलेली जेनिफर आता तिच्या वैयक्तिक आयुष्यात आईची भूमिका निभावण्यासाठी सज्ज झाली आहे. जेनिफर आणि तिचा नवरा असलेल्या कुक मारोनीने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. मात्र तिने मुलाला जन्म दिला की, मुलीला याचा खुलासा केला नसून तिची डिलिव्हरी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

जेनिफरने ती प्रेग्नेंट असल्याचे मागच्यावर्षी जाहीर केले होते. एका रिपोर्टनुसार ऑस्कर विजेत्या जेनिफर लॉरेंसने अमेरिकेच्या लॉस अँजेलिसमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. जेनिफरच्या एका फॅन ट्विटरवर लिहिले आहे की, “जेनिफर लॉरेन्स आता आई झाली आहे.” जेनिफरने कुक मारोनीसोबत ऑक्टोबर २०१९ मध्ये लग्न केले होते. कुक मारोनी एका आर्ट गॅलेरीचा मालक आहे. पेज सिक्सने २०१८ साली जेनिफर आणि कूकच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.

जेनिफरचं जन्म १५ ऑगस्ट १९९० साली अमेरिकेतील एका गरीब कुटुंबात झाला. तिचे बालपण एका शेतात व्यतीत झाले. ती केवळ १८ महिन्यांची असताना घोड्याची लाथ लागल्यामुळे तिच्या टेलबोनमध्ये इजा झाली होती. तिच्या आईवडिलांनी घरेलू उपचार करत तिला बरे केले होते. जेनिफरला हंगर गेम्स सिरीजमध्ये काम करून अमाप लोकप्रियता मिळवली. तिला अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे. एवढेच नाही तर ती हॉलिवूडमधील सर्वात जास्त पैसे घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हंगर गेम्स सिरीजमुळे तिला ऍक्शन वुमन ही नवी ओळख मिळाली. २०१५ आणि २०१६ साली ती जगातील सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री ठरली होती. हायएस्ट ग्रॉसिंग ऍक्शन अभिनेत्री म्हणून तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. जेनिफरच्या कमाईचा मोठा भाग रियल इस्टेट क्षेत्रातून ती कमावते.

हेही वाचा :

हे देखील वाचा