Friday, July 12, 2024

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही उडणार लग्नाचा बार, ‘या’ प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा केला साखरपुडा

सध्या मनोरंजन क्षेत्रात एकापाठोपाठ एक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif), यामी गौतम (Yami gautam) सारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी लग्न केले आहे. आता चित्रपट जगतातील सर्वात गाजलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दीर्घकाळ प्रेमप्रकरण गाजल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर मनोरंजन क्षेत्रात आणखी एका जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोण आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरू असतानाच हॉलिवूड जगतातूनही साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे हे जोडपे दुसरे कोणी नसून जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि बेन ऍफ्लेक (Ben Aflek) आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याच प्रेमप्रकरणाचा ते आता साखरपुड्यानंतर, लग्नाने गोड शेवट करतील, असा अंदाज चाहते लावत आहेत. जेनिफर लोपेझने तिच्या एंगेजमेंटची अंगठी दाखवत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यांच्या ही बातमी दिली आहे. ही पोस्ट करत तिने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे.” याआधी हे दोघेही पार्ट्या, इव्हेंट्स, रेड कार्पेट व्यतिरिक्त अनेकवेळा एकमेकांसोबत फिरताना दिसले आहेत.

बेन आणि जेनिफर यांनी २००२ मध्ये एकमेकांना डेट केले आणि दोघांनी एंगेजमेंट केली. पण दोन वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. याआधी जेनिफरने तीन वेळा लग्न केले आहे. तिने १९९७ मध्ये ओझानी नोआशी लग्न केले होते, मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळेच त्यांचे एका वर्षानंतर ब्रेकअप झाले. यानंतर तिने २००१ मध्ये क्रिस जुडशी लग्न केले, यावेळीही दोन वर्षांनी ब्रेकअप झाले. जेनिफरने २००४ मध्ये मार्क अँथनीसोबत तिसरे लग्न केले आणि १० वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा