अमेरिकन सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही कायम चर्चेत असते. तिचे फोटोज, तिचे व्हिडीओज हे सतत इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. तिच्या प्रत्येक गोष्टीची बातमी होत असते. अशी ही जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिचं नवं गाणं प्रसिद्ध केलं आहे, जे तुफान चालतंय आणि लोकांना आवडतंय देखील! परंतु जेनिफरचं हे गाणं वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. तिने या गाण्यात काही न्यूड शॉट्स दिले आहेत आणि त्यामुळे ती जास्त चर्चेत आली आहे.
जेनिफरने नुकतंच एक गाणं स्वतःच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केलं आहे. ज्याचं नाव आहे ‘इन द मॉर्निंग.’ या नव्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये ती विवस्त्र दिसत आहे परंतु तिच्या पाठीवर एखाद्या परिसारखे छोटेसे पंख दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये जेनिफरने लिहिलं आहे की, ‘मी तुझ्यावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम केले. हा व्हिडिओ म्हणजे एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा असून सांकेतिकांनी परिपूर्ण आहे. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त स्वत: ला बदलू शकता. त्यामुळे तुमच्या पंखांना जन्म द्या आणि जिथे तुमची काहीच किंमत नाही, तेथून दूर जा,’
जेनिफरचा हा व्हिडिओ तिच्या जगभरातील करोडो चाहत्यांनी आतापर्यंत पाहिला आहे. या व्हिडिओमधील जेनिफरचा लूक पाहून चाहते आवाक झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरलदेखील होत आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने वयाच्या पन्नाशीतही जेनिफरने स्वतःला फिट ठेवलं आहे. ते पाहूनच निम्मे जण चकित झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेहमीप्रमाणे याही वेळी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
सर्वांची आवडती जेनिफर लोपेझ ही अमेरिकेतील सुपरस्टार गायिका, अभिनेत्री आणि निर्मातीदेखील आहे. जेनिफरने इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डांसर म्हणून करियरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९९९ मध्ये तिने तीचा पहिला स्टुडिओ अल्बम प्रसिद्ध केला. यानंतर जेनिफरने पारकर, द बॉय नेक्स्ट डोअर, द बॅकअप प्लॅन, इनफ, सेकंड ऍक्ट, द सेल, मनी ट्रेन, द वेडिंग प्लॅनर, सेलेना या आणि इतर अनेक चित्रपटांमधून ती झळकली. हसलर्स या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती. या चित्रपटाची कथा क्राईम ड्रामावर आधारित आहे.