Friday, July 12, 2024

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर आला समोर, चाहत्यांना लागलीये चित्रपटाची आस

अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor ) बहुचर्चित ‘जर्सी’ चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.या चित्रपटात क्रिकेटप्रेमी मुलाची रंजक कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये शाहिद कपूर, मृणाल ठाकूर (Mrunal Thakur), पंकज कपूर(Pankaj Kapoor), गितीका मेहेंद्रु (Geetika mehandru) अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाबद्दल आता मोठी बातमी समोर आली असून चित्रपटाचा आणखी एक दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये शाहिद कपूरच्या अभिनयाची जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांत या ट्रेलरला ७५,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे चित्रपट चांगलाच गाजणार असल्याचे दिसत आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘जर्सी’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी प्रेक्षकांसाठी समोर येत आहे. शाहिद कपूर स्टारर या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर झी म्युझिक कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला होता मात्र आता निर्मात्यांनी त्याचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे क्रिकेटवरील प्रेम आणि समर्पण स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच या चित्रपटाच्या नव्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रेमकथेची आणि त्यात येणाऱ्या चढ-उतारांची झलकही पाहायला मिळाली. याशिवाय शाहिदचा क्रिकेटमध्ये परतण्याचा संघर्षही ट्रेलरमध्ये दिसत आहे.

यापूर्वी, अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या नवीन ट्रेलर रिलीजबद्दल माहिती दिली होती. हा चित्रपट १४ एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या जर्सीचे चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गौथम तिन्ननुरी यांनी केले आहे. अल्लू अरविंद प्रस्तुत, अमन गिल, दिल राजू आणि एस नागा वामसी निर्मित, हा चित्रपट जर्सी या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.  शाहिद कपूरचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर KGF: Chapter 2 चित्रपटासोबत प्रदर्शित होणार असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हे देखील वाचा