नोरा फतेही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर आहे. ती तिच्या किलर लुक्सने लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. सध्या ती टीव्हीवरील डान्स रिऍलिटी शो जज करत आहे. या दरम्यान, रिऍलिटी शाेमध्ये स्पर्धकांनी ‘बड़ा पछताओगे’ या गाण्यावर डान्स केला, ज्याला पाहून ती भावूक झाली. नोरा फतेही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले.
अभिनेत्री नोरा फतेही (nora fatehi) हिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही, पण हा एक्ट पाहिल्यानंतर ती स्वतःला थांबवू शकली नाही. नोरा फतेही म्हणाली की, “या एक्टने केवळ तिच्या हृदयालाच स्पर्श केला नाही, तर तिच्या भावनांनाही खेचले.” ती पुढे म्हणाली की, “हे गाणे तुटलेल्या हृदयाबद्दल बोलते कारण, मी सुद्धा कधीतरी अशाच परिस्थितीतून जात होती.” विशेष म्हणजे बडा पचताओगे हे गाणे प्रेमात मिळालेल्या विश्वासघातावर आधारित आहे. या गाण्यात तिच्याशिवाय विकी कौशलचीही महत्त्वाची भूमिका होती.
View this post on Instagram
नोरा फतेही अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. अंगद बेदीने नेहा धुपियाशी लग्न केले आणि तिच्यासोबत त्याला एक मुलगीही झाला. दरम्यान, नोरा फतेही अविवाहित आहे आणि सध्या ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
नाेरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर नोरा नुकतीच ‘थँक गॉड’ चित्रपटामध्ये दिसली. ती लवकरच जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि शहनाज गिलसोबत ‘हंड्रेड पर्सेंट’मध्ये दिसणार आहे. नोरा फतेहीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात. तिचे चाहेत तिच्या आगामी चित्रपटांसाठी उत्सुक आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. नोराची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. ( jhalak dikhhla jaa 10 fame nora fatehi betrayed in love told the story of heartbreak with moist eyes see viral video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी मुलगी पायलट तर धाकट्या मुलीचीही कौतुकास्पद कामगिरी; अलकाजी फोटो शेअर करत म्हणाल्या,…
लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…