‘झिम्मा’ चित्रपटाचं नाणं खणकलं! पहिल्या दोन आठवड्यात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, टीमकडून यशाचं सेलिब्रेशन


कोरोना काळात सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. खास करून मनोरंजन क्षेत्रावर लॉकडाऊन आणि नियमांचा परिणाम झाला. गेले अनेक महिने चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना मोठा तोटा झाला. अशातच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल करून चित्रपटगृहे ५०% आसन क्षमतेने खुली करण्याची परवानगी दिली. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर ‘झिम्मा’ हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाला. अनेक दिवसांनी चित्रपट प्रदर्शित झाला आणि केवळ ५०% आसन क्षमता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा चित्रपट किती चालेल याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत आणि हा चित्रपट दोन आठवड्यातच सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट हाऊसफुल झाला आहे. ‘झिम्मा’चे पहिल्या आठवड्यात ३२५ शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने ५.८३ कोटींचा टप्पा पार केला. लॉकडाऊननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. (Jhimma film team celebrated success og the film as collect ६ carores in two weeks)

या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिकनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टी केली आहे. यावेळी सगळे कलाकार उपस्थित होते. त्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले. तसेच सोनाली कुलकर्णी हिने फुगडी खेळून आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या या सिलेब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच येणाऱ्या दिवसात हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी सगळ्यांना आशा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Latest Post

error: Content is protected !!