मोठमोठ्या बजेटच्या चित्रपटांना टक्कर देत, काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट देशभरात चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले असून, चित्रपटाचे देशभरात कौतुक होत आहे.
विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. इतकेच नाही, तर अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात हा चित्रपट करमुक्त केला आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचतील. त्याचवेळी ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ (Savita Raj Hiremath) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. (jhund producer savita raj hiremath raised questions on film the kashmir files tax free said our film is also important)
सविता राज हिरेमठ यांनी शुक्रवारी फेसबुकवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट कमी महत्त्वाचा नाही. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी नुकतीच ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला आणि काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कथा अतिशय हृदयद्रावक आहे आणि ती एक कथा आहे जी सांगण्याची गरज आहे. काश्मिरी पंडितांसाठी हा आवाज चांगला आहे. पण ‘झुंड’ची निर्माती म्हणून मला धक्का बसला आहे. शेवटी ‘झुंड’ हाही एक महत्त्वाचा चित्रपट आहे. यात एक कथा आणि एक मोठा संदेश आहे, ज्याला प्रेक्षकांची प्रचंड प्रशंसा मिळाली आहे.”
सविता राज यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे की, चित्रपट निवडण्यासाठी आणि तो करमणूक करमुक्त करण्यासाठी सरकारचे कोणते निकष आहेत, ज्याच्या आधारावर सरकार चित्रपट करमुक्त करू शकते, माध्यमांद्वारे किंवा कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची रजा देऊन त्या चित्रपटाला पाठिंबा देऊ शकते. पुढे त्यांनी आपल्या चित्रपटाबद्दल सांगितले आणि म्हणाल्या की, “‘झुंड’ हा विषय आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटात केवळ जातीय आणि आर्थिक विषमता यावर चर्चा करण्यात आली नाही. उलट ‘झुंड’ समाजातील खालच्या स्तरातील लोकांना त्यांची यशोगाथा बनवण्याचा मार्गही दाखवते.”
‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसले होते. हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे (Vijay Barse) यांच्या जीवनावर आधारित आहे. यात बिग बींनी विजय बारसे यांची भूमिका साकारली होती. विजय बारसे यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना एक संघ तयार करण्याची प्रेरणा दिली होती. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
त्याचवेळी ‘द कश्मीर फाईल्स’बद्दल सांगायचे झाले, तर ‘झुंड’च्या एका आठवड्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘द काश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १२० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumar) असे स्टार्स दिसले आहेत. आत्तापर्यंत हा चित्रपट गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-