Wednesday, July 3, 2024

‘ती स्क्रीप्ट वाचत असताना साजिदने तिला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले’, जिया खानच्या बहीणीचे गंभीर आरोप

बीबीसीने नुकताच दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूवर ‘डेथ इन बॉलिवूड’ हा माहितीपट बनविला आहे. ज्यानंतर जिया खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जिया खानने आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूला जवळपास सात वर्षे उलटली आहेत. परंतु आजपर्यंत तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही. नुकताच जियाच्या माहितीपटातील दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. ज्यात जियाच्या लहान बहिणीने साजिद खानविषयी अनेक खुलासे केले आहेत.

‘डेथ इन बॉलिवूड’ या जिया खानच्या माहितीपटाचा दुसरा भाग समोर आला आहे. ज्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जियाच्या बहिणीने साजिद खानविषयी खुलासे केले आहेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये जियाची बहीण करिश्मा सांगत आहे की, ‘रिहर्सल चालू होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती आणि साजिदने तिला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले. त्यावेळी काय करावं हे तीला समजू शकलं नाही. ती म्हणाली की, चित्रपट अजून सुरू झालेला नाही आणि हे सर्व घडतंय. जिया त्यावेळी घरी आली आणि खूप रडली होती.’

पुढे जियाची बहीण करिश्मा म्हणाली, “जिया म्हणाली होती की- ‘माझा करार झाला आहे आणि जर मी हा चित्रपट सोडला तर ते माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील आणि मला बदनाम करतील. पण जर मी चित्रपट केला तर माझा लैंगिक छळ होईल. अशा परिस्थितीमध्ये मला काही ना काही गमवावंच लागणार आहे.’ म्हणून तिने तो चित्रपट केला.” यादरम्यान करिश्माने तिच्यासोबत घडलेल्या घटनेविषयीही सांगितलं.

https://twitter.com/siddanthdaily/status/1350959307718881282?s=19

यावेळी करिश्माने तिची शोकांतिका सांगितली की, “मला आठवतेय की मी माझी मोठी बहीण जियासमवेत साजिद खानच्या घरी गेले होते. त्यावेळी मी केवळ १६ वर्षांची होते. मी स्ट्रॅपी टॉप घातला होता आणि स्वयंपाकघरातील टेबलावर बसले.” साजिद माझ्याकडे टक लावून म्हणाला- ‘त्याला सेक्स हवा आहे.’ माझी बहीण जीया त्वरित माझ्या बचावासाठी आली आणि म्हणाली – ‘नाही, तू कशाबद्दल बोलतोयस?’ यावर तो म्हणाला- ‘बघ ती कशी बसली आहे.’ माझी बहीण म्हणाली – ‘नाही, ती भोळी आहे. ती अजूनही लहान आहे. तिला काय हवंय काय नकोय हे देखील माहित नाही.’ त्यानंतर लगेच आम्ही दोघी तिथून निघून गेलो.”

विशेष म्हणजे २०१८ मध्ये जेव्हा #MeToo चळवळ सुरू होती तेव्हा बर्‍याच महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. बॉलिवूडच्या अनेक नामांकित अभिनेत्रींचा या यादीत समावेश आहे. त्यानंतर साजिद खान याला हाऊसफुल पुढच्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलंय.

हे देखील वाचा