अभिनेत्री जिया खानने २०१३ साली आत्महत्या करत तिचं जीवन संपवलं होतं. जियाच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर तिचा कथित बॉयफ्रेंड असणाऱ्या सूरज पांचोलीला देखील अटक झाली. नंतर त्याची सुटका देखील झाली. मात्र त्यानंतर या प्रकरणाचे पुढे काहीच घडले नाही.
जियाच्या आत्महत्येनंतर आठ वर्षांनी तिच्या केसची सुनावणी स्पेशल सीबीआय कोर्टात होणार आहे. सेशन कोर्ट जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीची तिला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करण्याच्या आरोपावरून ट्रायल चालू होती. आता ही ट्रायल देखील सीबीआय कोर्टाकडे ट्रान्सफर केली जाणार आहे.(jiah khan suicide now cbi court will hear)
सेशन कोर्टाच्या जजने त्यांच्या ऑर्डरमध्ये सांगितले की, “सध्या प्रकरणाचा तपास सीबीआय /एससीबी करत असून, त्यांनी सप्लिमेंटरी चार्जशीट देखील दाखल केली आहे. सीबीआई ज्या केसेसचा तपास करते त्याच केसच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट्स असतात. अशा केसेससाठी स्पेशल जज सुद्धा निवडले जातात. सीबीआयने दाखल केलेल्या केसेससोबत डील करण्याची परवानगी मला नाहीये. मला वाटते की या केसला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केले जावे.”
जे कोर्ट सीबीआयने दाखल केलेल्या अर्जावर सुनवाई करत आहे, त्यांनी ही ऑर्डर पास केली आहे. कारण एजन्सीकडे प्रत्येक केसेससाठी वेगळे कोर्ट असतात. सीबीआयने जिया आत्महत्या प्रकरणात पुढे चौकशी करण्याची मागणी केली होती. आता कोर्टातील प्रिन्सिपॉल जज या केसला सीबीआयकडे सुपूर्द करणार आहे.
Actor Jiah Khan death case: CBI court will now hear the case pending for 8 yrs. The sessions court, which was conducting a trial against her boyfriend actor Suraj Pancholi on charges of alleged abetment, has said that the trial should be transferred to a spl CBI court
(File pic) pic.twitter.com/nYeBYoulHZ
— ANI (@ANI) July 30, 2021
याआधी या केसची पहिली ट्रायल मार्च २०१९ मध्ये सुरु झाली होती. डिसेंबर २०१९मध्ये सेशन कोर्टासमोर सीबीआयने या केसची पुढे चौकशी आणि काही गोष्टी पुन्हा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्याची मागणी केली आहे. यामध्ये जियाने आत्महत्या करताना वापरलेल्या ओढणीचा देखील समावेश आहे. याला चंदिगढच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब्रॉटरीकडे पाठवले जाणार आहे. सीबीआयने जियाच्या मृत्यू आधी सुरज आणि जिया यांच्यामध्ये ब्लॅकबेरी मेसेंजर मेसेजेसला सुद्धा पुन्हा रिट्रीव करण्याची मागणी केली आहे. या दोघांच्या फोन्सला अमेरिकेतील फॉरेन्सिक युनिट फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनला पाठवण्यासाठी सांगितले आहे.
यासर्व सर्व घटनेवर सुरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील यांनी सीबीआयच्या सर्व मागण्यांचा विरोध केला आहे. जियाने ३ जून २०१३ साली तिच्या जुहू येथील राहत्या घरत आत्महत्या केली होती. त्यानंतर १० जून २०१३ ला जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जुलैमध्ये जामीन मिळाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?
-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप
-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी