Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड पहिल्याच दिवशी फ्लॉप झाला आलीयाचा जिगरा ? अशी राहिली बॉक्स ऑफिसवर कामगिरी…

पहिल्याच दिवशी फ्लॉप झाला आलीयाचा जिगरा ? अशी राहिली बॉक्स ऑफिसवर कामगिरी…

आलिया भट्टचा ‘जिगरा‘ हा 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहते चित्रपटगृहांमध्ये याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या टीम व्यतिरिक्त आलिया भट्टनेही ‘जिगरा’चे जोरदार प्रमोशन केले ज्यामुळे हा चित्रपट खूप गाजला. 

अखेर शुक्रवारी, 11 ऑक्टोबर रोजी हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटगृहात दाखल झाला. मात्र, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीची कामगिरी सुमार राहिली आहे. जाणून घेऊया ‘जिगरा’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींचा ओपनिंग केला आहे?

‘जिगरा’ हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या सिनेमात आलिया भट्टनेही अनेक खतरनाक ॲक्शन सीन केले आहेत. ‘जिगरा’चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवेल असे वाटत होते. 7 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाची कामगिरी निराशाजनक आहे. ‘जिगरा’ला रिलीजच्या पहिल्या दिवशी फारसे प्रेक्षक मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोही रद्द करावे लागले. आता चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘जिगरा’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात.

‘जिगरा’ रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करू शकला नाही. मात्र, आलिया भट्ट स्टारर चित्रपटाला दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा मिळेल आणि त्याची कमाई वाढेल, अशी आशा निर्मात्यांना आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या वेट्टैयान आणि राजकुमार राव यांच्या विकी विद्या का वो व्हिडिओमधून या चित्रपटाला स्पर्धा होत आहे. त्यामुळे ‘जिगरा’ची पहिल्या दिवसाची कमाईही कमी झाली आहे. आता हा चित्रपट वीकेंडला किती बिझनेस करतो हे पाहायचे आहे.

‘जिगरा’चे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. या ॲक्शन थ्रिलरमध्ये वेदांग रैनासोबत शोभिता धुलिपाला आणि मनोज पाहवा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट सत्या (आलिया भट्ट) आणि अंकुर (वेदांग रैना) यांच्याभोवती फिरतो. सत्या तिचे भाऊ अंकुरवर खूप प्रेम करते आणि ती त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

रणवीर शौरीने केला ‘बिग बॉस’बद्दल खुलासा; म्हणाला, ‘शोमध्ये येण्यापूर्वी कधीही संशोधन पूर्ण करू नका…’

 

हे देखील वाचा