बॉलिवूडमधील प्रतिभासंपन्न अभिनेता म्हणून जिमी शेरगीलला ओळखले जाते. भरमसाठ भूमिका न करता मोजक्याच भूमिकांमधून त्याने स्वतःला सिद्ध केले. पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा जिमी लाइमलाईटपासून लांब असणारा जिमी आता त्याच्या आगामी ‘आजम’ नावाच्या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. याच वेळेस एका मोठ्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटले आहे.
कंगनासोबत जिमीने ‘तनु वेड्स मनू’ सिनेमात एकत्र काम केले. या सिनेमामध्ये काम करणे त्याच्यासाठी निव्वळ योगायोग होता. तो म्हणाला, “या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या आनंद एल राय आणि मी चांगले मित्र आहोत. माझा पहिला सिनेमा ‘स्ट्रेन्जर्स’ मी त्याच्यासोबत केला त्यानंतर ते हा सिनेमा माझ्याकडे घेऊन आले. मी लगेच होकार दिला.”
कंगनाबद्दल बोलताना जिमी म्हणाला, “कंगना खूपच उत्तम कलाकार आहे. मला वाटते तिने आता तिच्या अभिनयावर अधिक लक्ष दिले पाहिजे. जर तिने तिचे संपूर्ण लक्ष अभिनयावर दिले तर तिच्या सारखी अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये नसेल. तिने इतर सर्व गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे.”
दरम्यान जिमी हा पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कमालीचा सक्रिय आहे. त्याने ‘माचीस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो ‘हासिल’, ‘मोहब्बतें’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘तनु वेड्स मनु’, ‘मेरे यार की शादी है’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आदी अनेक चित्रपटांमध्ये दिसला. याशिवाय तो एक निर्माता असून त्याने अनेक पंजाबी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा
आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन