Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ‘शकुंतला देवी’ फेम अभिनेता आगामी सिनेमात साकारणार ‘सिंगल फादर’ची भूमिका, पोस्टर रिलीझ

‘शकुंतला देवी’ फेम अभिनेता आगामी सिनेमात साकारणार ‘सिंगल फादर’ची भूमिका, पोस्टर रिलीझ

‘शकुंतला देवी’, ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘दुर्गा माता’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला अभिनेता म्हणजे जिस्शू सेनगुप्ता. तो सध्या त्याच्या आगामी बंगाली चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. त्याच्या ‘बाबा बेबी ओ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा पोस्टर बघून त्याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट बघत आहे.

नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांनी विंडो प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जिस्शू दोन लहान मुलांसोबत खेळताना दिसत आहे. या चित्रपटात तो सिंगल फादर म्हणजेच सरोगसी फादर असणार आहे. त्यामुळे एक बाप म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या आणि आई-वडील अशा दुहेरी भूमिकेत तो दिसणार आहे. या चित्रपटात त्याला दोन जुळी मुले दाखवली आहेत.

‘बाबा बेबी ओ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी या करत आहेत. त्या एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर चित्रपट करणार आहे. सरोगसीमधून झालेल्या मुलांना त्यांचे वडील सांभाळत असतात. अनेक पारंपारिक कथांच्या पलीकडे जाऊन ‘झिनिया सेन’ यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये या चित्रपटाची कथा लिहिली आहे. २१ मार्च, २०२१ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या चित्रपटाची शूटिंग स्थगित केली आहे.

जिस्शू सेनगुप्ता याने त्याच्या या आगामी चित्रपटाबाबत बोलताना सांगितले आहे की, “बाबा बेबी ओ या चित्रपटाची कहाणी खूपच वेगळी आहे. मी या आधी कधीच असे पात्र निभावले नाही. लहान मुलांसोबत काम करताना मला खूप आनंद झाला आहे, कारण लहान मुलांसोबत मला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मी जवळपास एक वर्षानंतर बंगाली चित्रपट करत आहे. मला खूप चांगला अनुभव येत आहे. मी अशी आशा करतो की, आमची ही मेहनत प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

या चित्रपटात तो एक सरोगसी फादर बनला आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या वैवाहिक जोडप्याला मूल होत नसेल, किंवा स्त्रीला गर्भधारणेसाठी काही समस्या येत असेल, तर सरोगसी या पर्यायाचा अवलंब केला जातो. या पद्धतीत स्त्रीचे ‘स्त्री बीज’ आणि पुरुषांचे ‘शुक्राणू’ यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते. ते एका सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर ९ महिने ते बाळ त्या मातेच्या पोटात वाढले जाते. ९ महिन्यांनंतर ती स्त्री त्या बाळाला त्याच्या माता-पित्याकडे सुपूर्त करते. त्यानंतर त्या आईचा त्या बाळावर कायदेशीररित्या कोणताच अधिकार राहत नाही. अशाप्रकारे ही सरोगसीची प्रक्रिया पूर्ण होऊन कोणीही आई- वडील होण्याचा आनंद घेऊ शकतो.

बॉलिवूडमध्ये देखील अनेक कलाकारांनी सरोगसी या पर्यायाचा वापर करून पालकत्वाचा आनंद घेतला आहे. यात तुषार कपूर, सोहेल खान, करण जोहर, लीसा राय, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक यांसारख्या कलाकारांच्या समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…

-स्त्री- पुरुषातील भेद संपवत मराठमोळ्या अभिनेत्याने धोतर म्हणून नेसली साडी, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

हे देखील वाचा