Sunday, February 23, 2025
Home मराठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड झाले निर्माते, ‘या’ ऐतिहासिक चित्रपटाचे केले शिर्षक अनावरण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड झाले निर्माते, ‘या’ ऐतिहासिक चित्रपटाचे केले शिर्षक अनावरण

महाराष्ट्र राज्याला साधुसंताचा, थोरामोठ्यांचा, शूरवीरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्राला साधुसंताची, समाजसुधारकांची पवित्र भूमी म्हणून ओळखले जाते. या साधुसंतांनी अनेक राजे महाराजांनी समाजात सुधारणात्मक क्रांती घडवून आणली. तसेच अनेक धाडसी निर्णय घेत लोकांंमध्ये वैचारिक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले. यामधीलच एक नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज. लोकमान्य आणि लोकांमध्ये आदर्श नेते म्हणून शाहू महाराजांचे नाव घेतले जाते. याच रयतेच्या राजाच्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची निर्मिती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काय आहे ही बातमी चला जाणून घेऊ. 

दिनांक २६ जून हा दिवस कोल्हापूर संस्थानाचे आदर्श राजे शाहू महाराज यांचा जयंतीदिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले तसेच स्त्री रक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. म्हणूनच एक आदर्श राजे म्हणून त्यांची  इतिहासात नोंद घेतली जाते. लवकरच या आदर्श राजांवरील ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचा शिर्षक लॉंचिंग सोहळा नुकताच न्यू शाहू पॅलेसमध्ये पार पडला ज्यासाठी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण सुखराज यांनी तर निर्मिती विनय काटे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/tv/CfOgM1UgGKU/?utm_source=ig_web_copy_link

शाहूमहाराजांचे चरित्र लिहणारे प्रसिद्ध इतिहासकार जयसिंंगराव पवार यांनी या चित्रपटाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनयावेळी दिले तर जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट समाजात शाहू महाराजांचा वारसा जतन करण्यासाठी महत्वाचा ठरेल असे प्रतिपादन केले आहे. आता प्रेक्षकांनाही या ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विद्रोह फिल्मस या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात  येणार आहे.

हे देखील वाचा